Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २३६

श्री
श्रीमद्वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री नागेश दीक्षित व रघुनाथ दीक्षित व अणा दीक्षित व बाबा दीक्षित क्षेत्र श्रीकरहाटक याशि
प्रीतिपूर्वक गोविद दीक्षित गरुड क्षेत्र मजकूर मुकाम नेवरी कृतानेक साष्टाग नमस्कार विनति ऐशी जे येथील मजकूर तरि श्रावण वद्य १४ बुधवार पावेतो आपुले कृपे करोन वर्तमान यथास्थित असे विशेष आह्मी काही कार्योद्देशे ग्रामातरास जावयाकरिता निघालो ते नेवरी मुकामीस मार्गेकरोन आलो तेथे हरी सखाराम याची गाठ पडली त्याने आपली निप्कृति होण्याचा विचार पुसला तेव्हा आह्मी त्यास जो विचार सागण्याचा होता तो क्षेत्रतरफेने सागोन त्यास दुराचार न घडण्याचा तोडी बहुत प्रकारे सागितल्या परंतु तो परावृत्त निकालसपणे होत नाही आणि परभारा बोलणे बोलतो की मी क्षेत्रास जावोन शुत्धपत्र हरत-हेने घेऊन येईन मजला वरकड तोडजोडीची गरज नाही ऐसा मजकूर ऐकण्यात आला सबब आपणास सूचनार्थ हे पत्र लिहिले असे क्षेत्रातील विचार सर्व आपुले ध्यानात वागत च आहे अलीकडील अप्रौढमडळीत फुट होऊन भलता विचार होईल याचा निर्बध आपुल्याकडोन जरूर राखला पाहिजे ज्या दोषा ज्या दोषा वर बहिष्कारपत्र आपण पाठविले त्या कलमाची निकालसता बापभाऊ व भोवर गावी शरीरसबधी ज्ञातिवर्ग आहेत त्याचे विचारास येयील तैशी जाहली असता च नीट नाही तरी केवळ द्रव्यव्यवहाराचा लोभ ठेवोन कोणी केल्यास क्षेत्राचा वकूब जायील आणि आसमतात मोठे मडळीचा उपहास बहुत च होयील या सर्व गोष्टी आपुले लक्षात वागत च आहेत केवळ आह्मी लेहून कळवावे ऐसा प्रकार नाही
ताजाकलम-खटावकर कोणी ब्राह्मण येथे आठ चार दिवसा मागे आला होता तो हरीपताशी बोलिला की वरघाटी कराडकरास पत्र पाठवावयास सबध नाही दोष गैरदोष ह्मणण्याचा वरघाटी अधिकार आम्हा खटावकरास च आहे हाहि मजकूर आपणास श्रुत जाहला पाहिजे निरतर लोभवृद्धि करीत जावी हे विनति