Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१४
१६३८- ४०

श्रीआईआदिपुरुष
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नारायणभट गिजरे
स्वामी गोसावी यासी

विद्यार्थी कृष्णाजी परशराम प्रतिनिध कृतानेक सा। नमस्कार विनति उपरी तुह्मी समस्ताचे पत्र पाठविले ते पावले अभिप्राव कळो आला ऐसीयास तुह्मी असता हरभट यास चिता काय आहे तरी स्वामी सर्वशक्ती वेचून हरभट कडेसी पडीत ते गोष्ट केलियाने आह्मास सतोष आहे वेदमूर्तिचा व आमचा वियोग न होय ते गोष्ट केली पाहिजे वेदमूर्ती वर सकट आले आहे तेणे करून आह्मास श्रम होतात तरी स्वामीनी आह्मा वरी दया करून हरभटा वरला शब्द चुकून तुह्मी सहवर्तमान हरभट असे उभयता आमचे भेटीस येणे अनमान कराल तरी आमची शफत असे बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति क्षेत्राचा महिमा राही ती गोष्ट केली पाहिजे हे विनंति