Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १२६
१६९२ आश्विन वद्य ९

श्रीगुरुनिरजनशिवदासगुरु
करीना शके १६९२ विकृति नाम सवत्सरे आश्विन वद्य नवमी.शनिवार तद्दिनी काशिनाथ गोसावी शुक्ल वास्तव्य क-हाडक्षेत्र आमचे तीर्थस्वरूप कृष्णाजी नाईक व केशव नायकाचे तीर्थस्वरूप मैराळ नाईक मारुलबोहल्यात राहत असता आमचे तीर्थस्वरूप विरक्त जाले चौदा वर्षाचे होते मातुश्री बारा वर्षांची होती उभयता निघोन क-हाडी निरजन स्वामी होते त्यास शरण आले निरजनस्वामीनी अनुग्रह देउऊन त्याच्या सगतीने तीर्थयात्रा बहुत दिवस केल्या स्वामीनी शिवदासगोसावी नाम ठेऊन क्षेत्रात शुक्लवृत्ति करणे
ह्मणून आज्ञा केली भीक्षा करून आसता आमचे वडीलबंधू तीर्थस्वरूप नागशेबा व आह्मी जालो क-हाडी राहिलो आमचे चुलते मैराळ नाईक चाटेपन करू लागले मग मारुल सोडून सातारियास गेले तेथे दुकान घालून राहिले त्याचे दोघे पुत्र धोडोबा नाईक व केशव नाईक केशव नायकाचे दोघे पुत्र बाबू व गगाधर ते सातारियात व आह्मी क-हाजी राहिलो असता आमचे बधू नागेशबाबा वारणेत उखळवास गेले गावकराहून घेऊन मठ बांधून दिल्हा व दोन बिघे सेत देऊन स्थापना केली पुढे काळे करून नागेशबाबा कैलासवासी जाले मग आह्मी मठांत नरशिहा ब्राह्मण ठेविला पुढे, आह्मांस क्षेत्रात असता केशव नायकाचे पुत्र गगाधर दुखणेकरी आमच्या घरास आला आह्मी त्यास व केशव नायकास पत्र न पाठविता न बलाविता घरास आला आह्मी त्यास पुशिले येथे येयास कारण काय गंगाधर बोलिला आपणास बरे वाटत नाही व आपले बधू व भावजय मानीत नाहीत यास्तव तुह्मा पासीं राहीन पुढे सागाल त्याजप्रमाणे वर्तुणूक करीन आह्मा बरोबर च्यार महिने होता बरा जाला आह्मी बोलिलो की आपल्या घरास जाणे त्यास तो बोलिला की मी देशातरास जाईन परतु सातारियास जाणार नाही त्याजवरून आह्मी विचार केला गगाधरास स्त्री नाही त्याज वरून आह्मी विचार केला निस्पृह आहे नागेश बावाच्या मठात सरक्षणास योजावा मग मठास नेऊन गावकरास भेटऊन मठ व देवतार्चन त्याचे जें होते ते गगाधराच्या स्वाधीन करून सत्कर्म करून मठात राहणे ह्मणून सागितले गगाधराच्या भेटीस केशव नाईक आले ते हि मठात राहिले पुढे गगाधर आह्मा बरोबर च्यार महिने होता आमचा मेहुणा चिरजीव खडोबा यासी कळह करून प्रात काळी आह्मास न पुसत वारणेत गेला याला साक्षी जनार्दनाच्यार्य टोनपे व कृष्णाजी त्रिबक आहेत गगाधर पळून गेला त्याजवरून आम्हास क्रोध आला आम्ही केशव नाईक व गावकरास पत्र पाठविले जे तुह्मास मठात राह्यास समध नाही तुह्मी स्थळातर करणे आणिखी कोणाच्या स्वाधीन मठ करू त्यास गावकरानी राहून घेतले गगाधर आमचा सप्रदायी नव्हे अैसे आसता आह्मास बरे वाटेनासे जाले अत्यत अवस्था जाली त्याजवर गगाधरास आह्मी पत्र पाठविले तुज वाचून आह्मास कोणी नाही सर्व तुझे आहे देखत पत्र लवकर येणे गगाधराने आमचे पत्र मानिले नाही दुसरे पत्र पाठविले आमची अत्यत अवस्था आहे तरी अगत्य येणे आला नाही अैसी पत्रे आठ