Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १२३
१६६६ अधिक आषाढवद्य ५

श्री काळभैरवप्रसन् ,
मूळतालीक बाळबोध

स्वस्ति श्रीनृप शालिवाहन शके १६६६ वर्षे रक्ताक्षी नाम सवत्सरे अधिक वद्य पचमी तद्दिनी राजेश्री तीर्थरूप अणा प्रति रघूने खडपत्र लेहुन दिल्ले एसे जे तुह्मी व अह्मी व भिमा ऐसे त्रिवर्ग विभक्त जहालो त्यास पचधातू तोळा व मासा व अडिका रुका हडे व भाडे व पोथी पुस्तक व पशू व दाणे कागदपत्र इनामाचे व वृत्तीचे व टाळगावीचे व धर्मादायाचे व ब्रह्मसभेचे ऐसे जे घरामध्ये जे होते ते तुह्मी अह्मी तीघानी अपलेले विभाग घेउन समजलो तीन घराची स्थळे त्यात वडिलाचा स्थळावरि तुह्मी राहावे रामराया बाबेति स्थळावरि अह्मी राहावे भिमान महारुद्रा बाबेति स्थळावरि राहावे ऐसे सतोषे करून तिघे जणे समजलो या खेरीज अग्रहारिचे शेत व टाळगाव वृत्ति ज्योतिषाचा विभाग व उपाध्येपणाचा विभाग व गावगन्ना इनाम व कोणेगाविचा इनामाचा विभाग व राजेश्रीचे तीर्थ उपाध्यपण अर्धे सैदापुरीचा तीर्थ उपाध्यपणाचे तीस बीघे आहेत त्याचा निमे विभाग व अणिखि तीर्थ- उपाध्यपण ऐसे समाईक आहे हे तुह्मी व अह्मी व भीमाने ऐसे तिघानि तीन ठाई यथाविभागे भक्षावे लेकराचे लेकरी भक्षून सुखरूप असावे परस्परे विवाद करायास समध नाहि यास जो अन्यथा करील तो देवब्राह्मण द्रोही त्यास श्रीची शफथ असे हे खडपत्र लेहुन दिधले सहि लिहिल्याप्रमाणे रघुनाथ मान्य वळी सुमार सदतीस ३७
गोही
बाबा दिक्षित गिजरे
पत्राप्रमाणे शिवरामभट्ट गिजरे पत्राप्रमाणे ढुढीराज पाठक क-हाडकर पत्राप्रमाणे साक्ष धोडभट्ट वैद्य धोडभट्ट गिजरे साक्षी
पत्राप्रमाणे साक्ष नारायण दीक्षित बिन्न यज्ञेश्वर दीक्षीत
पत्राप्रमाणे साक्ष बाळाजी नाईक ह्मेत्रे बीन नरसाबा नाईक ह्मेत्रे
गोपाळभट्ट गिजरे
स्वहस्ताक्षर साक्षि