Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२५
१६८२ श्रावणशुद्ध १ सोमवार
श्री कृष्णा ( क) कुद्यती सगमो जयति
स्वस्ति श्रीमत् करहाटक क्षेत्रस्य समस्त ब्राह्मण व पचाईत यानी निवाडपत्र करून दिले दिले शके १६८२ वर्षे विक्रम नाम सवत्सरे श्रावण शुद्ध १ सोमवार ते दिवसी राजेश्री गोपाळभट्ट गिजरे याप्रति नारायेण दीक्षित गिजरे भिमदीक्षित गिजरे यादवभट्ट गिजरे बाळकृष्णभट्ट गिजरे धोडभट्ट गिजरे नरसिभट्ट गिजरे यानी लेहून दिले ऐसे जे तुमचा काळ समीप तुह्मास पुत्रापत्य नाही पुढे दोघी बायकाचे चालावे लागते याचा विचार काय केला त्यावरून तुह्मी बोलिला की आपले घर व शेते इनाम मौजे सैदापूर व कोणेगाव व कारवेवडगाव व शेरे व दुशेरे व कोडोली येथील ज्योतीष अपल्या विभागाचे आहे जो याचे योगक्षेमाचे चालवील त्याच्या स्वाधीन करतील तुह्मास सकट काय आहे ऐसे बोलिला त्यावरून पाच ग्रहस्त व अह्मी येउन अवघ्ये येकत्र होउन निश्चय केला की तुह्मा पाठीमागे यावत्काळ दो आहे तावत्काळ याचे चालउ त्या दोघीस मान्य करा मग दोघीस मान्य करून येणे प्रमाणे पाचाच्याविद्यमाने आपले अशाचे भाउ याच्या विद्यमाने करार केला बितपशील मूलि धाकटी नवरी आहे तीचे लग्न करायाचा समयी अह्मी विभागाप्रमाणे द्रव्य चोघाच्या विचारे देउ १
१ ज्योतीषगाव पाच १ इनामगाव दोन
५ २
घर क्षेत्रातील येक.१
१
ज्योतीष व, इनाम तुमच्या अशाचे आहे ते त्यानी दोघीनी भक्षावे अह्मास भक्षायास कारण नाही आपल्या घरात राहून काळक्षेप करावा पुढे किरकोळ खर्चास पाहिजे याजकरिता तुह्मा दोघीस ज्योतिषाचा व इनामाच्या ऐवजा वेघळे रुपये २१ पचवीस दरसाल देऊ त्याप्रमाणे भक्षून सुखरूप असावे यास जो अतर करील तो अन्यायी त्याला तुमच्या पाठीमागे तुमचा विभाग भक्षायास कारण नाही येणेप्रमाणे जो तुह्यात चालवील तोच भक्षील यास जो अतर करील तो देवब्राह्मण द्रोही त्याला पूर्वजाचा व कुळस्वामीचा शपथ असे हे पत्र लिहिले सत्य वळी सुमार २० वीस बिकलम बाळकृष्णभट ढवळीकर ॥००॥
येणेप्रमाणे पाच भाऊ मान्य गिजरे कागदपत्र वृत्तीचे जे तुह्मापाशी आहेत ते तुह्मापाशी जतन ठेवणे जे समई अम्हा कार्य लागल ते समयी येकाच्या गुजारतीने अम्हास देणे कार्य करून गुजारतीने तुह्मापाशी फिरोन देउ वळी २४ चवीस ।। ।।
साक्षी
१ पत्रप्रमाण मानभट्ट, वैद्य १ मोरो सीवदेव पारसनीस पा।
१ बाजिभट्ट मजकूर
१ गरूड नारायणभट्ट १ माणको रघुनाथ कुलकर्णी मौजे
माणीकभट घोडके वीरवड प्रा। मा।र
साक्ष बापुजी होनाजी कुलकर्णी का। मजकूर पत्रप्रमाण साक्ष गोपाल गोविंद कुलकर्णी का। कहाड
१
वेकाजी नरहरी कुलकर्णी का। कराड
१
अबाजी तुकदेउ कुलकर्णी मौजे कोरेगाव प्रा । मजकूर
१