Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

३ गुराची माने फाडावे ते समई याची कलम तपसीलवार
१ म्हनाक याने कुमडी येक घ्यावी
१ दुसरी कुमडी माननाक याने घ्यावी
१ आतडी व कान काननाकाने घ्यावी कलम १
-------


१ मेहतरकीचा मान घास मुटका व रानातील पेडी काडी जी मिलती माननाक
व म्हसनाक यानी दोईसाही घ्यावी कलम १
१ लक्षुमीबाहेरची जत्रा व गायजत्रा होईल तिचा मान भुडी म्हसनाक याने आणावी आणी माननाकाचे घरी रहावी मग काननाकास जेवायास बोलावे आणी तिघानी जेवावे कलम १
१ फिरती तराळकी ती जागा वरसली प्रा। करावी कलम १
१ गाव मोट व महाराटी व माहारकी व बलुते ती जागा बरोबर येता विभाग वाटून घ्यावी आणीक हजरीस माहार तिघाजणांनी उभा करावा कलम १
१ गुढेचा पाडवेचा मान लिबाचा पाला पाटील लिब देतील तो माननाक याने पदरी घेऊन मग म्हसनाक याने बालगोपाल यास द्यावा कलम १
-----

येणेप्रमाणे निवाडा करून महार मजकूर याची समजूत पडली कलम लिहिले बरहुकूम ज्याचे त्याणी मान उचलावे याप्रमाणे या पत्रास घालमेल जो करील तो दिवाणचा गुणेगार व देवाचा अन्याई व वतनाचा खोटा हे लेहून दिल्हे निवाडपत्र सही तेरीख छ २७ मोहरम शके १७१० कीलकनाम संवत्सरे आश्वीन वा। १४ बि॥ बहिरो आनत कुलकर्णी माजे मा। पत्राप्रमाणे साक्षी ता। वार सैदापूरकर मोकदमानी
१ लक्षुमण बिन सभाजी पा ।
१ कुषजी बिन कोनाजी पा।
१ धोडजी बिन मलजी पा।
१ जोत्याजी बिन बापूजी पा।
१ जानोजी बिन माघारजी पा ।
१ गिरजी बिन माहामाजी पा ।
१ मयाजी बिन लिबाजी पा।
१ हाणगोजी बिन राणोजी पा। मौजे मा।
१ सताजी बिन रखमाजी
१ आपाजी बिन जिवाजी पा ।