Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १२८
१७११ फाल्गुनवद्य १०
श्री
वेदशास्त्रसपन्न राजश्री समस्त ब्राह्मण व धर्माधिकारी उपाध्ये जोतिषी प्रा। क-हाड स्वामीगोसावी यास सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु।। तिसैन मया व अलफ को। पेण पो। साकसे येथील समस्त ब्राह्मण याणी हुजूर येऊन निवेदन केले की श्रीमत कैलासवासी नारायणराव साहेब याचे कारकीर्दीत परभूचे कर्माचरणाविशई सरकारातून ठराव करून दिल्हा त्याप्रमाणे त्याणी वर्तावे ते न करिता आपला धर्म सोडून मनश्वी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकर्मे करितात येविसी त्यास ताकीद होऊन बदोबस्त जाला पाहिजे ह्मणोन त्याजवरून मनास आणिता पेशजी कैलासवासी तीर्थरूप रावसाहेब याचे वेलेस चौकसी होऊन परभूचे वर्तणुकेविसी कलमाचा ठराव जाला त्याप्रो। त्याणी सरकारात कतबा लेहून दिल्हा त्यातील कलमे बितपसींल
१ वैदिकमत्रे करून काहीच कर्मे करणार नाही
१ वैदिकमत्र जे येत असतील त्याचा उचार करणार नाही
१ भाताचे पिंड करणार नाही
१ देवपूजादीक विहितकर्मे पुराणोक्तमत्रे करूनच करू व ब्राह्मणभोजन आपले घरी करणार नाही
१ शालग्रामपूजा करणार नाही
१ ज्या देवास शूद्र जातात त्या देवास आम्ही जाऊ
१ ब्राह्मणास दडवत मोठ्याने म्हणत जाऊ व आपले जातीत हि दडवतच म्हणत जाऊ
१ वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणके व शागीर्द ब्राह्मण व ब्राह्मण बायको चाकरीस ठेवणार नाही व आपले घरी हि ठेवणार नाही
१ आमचे जातीमध्ये आपले सतोषे पाट लावितील त्यास आह्मी आडथला करणार नाही
----
येणेप्रमाणे नव कलमे लेहून दिल्ही असता परभू आपले घरी चोरून ब्रह्मकर्मे करितात यामुले पेणकर ब्राह्मणाचा व त्याचा कजिया वाढोन परभूचे घरची सर्व कर्मे बद जाली त्यास येविसीचा हालीहि विचार करिता परभूचे कर्माचरणाविशई पेशजी चौकसी होऊन कलमे ठराऊन दिल्ही आहेत त्याप्रमाणे त्याणी वर्तावे ते न करिता आपला धर्म सोडून चोरून मनश्वी वर्तणूक करितात हे आनुचित पेशजी कलमे ठराऊन दिल्ही आहेत तीच योग्य ऐसे शिष्टसमते ठरोन पुण्यात परभूची घरे आहेत त्यास हुजूर ताकीद करून हे पत्र तुह्मास सादर केले असे तरी प्रा। मा।र येथे परभूची घरे असतील त्यास निक्षूण ताकीद करून सदरहू कलमाप्रमाणे वर्तवीत जाणे जाणिजे छ २३ जमादिलाखर आज्ञाप्रमाण
बार