Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

ऐसे चौघे साक्षी आहेत चौघापैकी दादभट ढवलीकर याच्या साक्षीने साताराच्या मुकामी बोलिले ऐसी तुह्मी तकरीर केली त्यावरून सदासिवभटास पचाइतानी पुसिले की तुह्मी क-हाडी आपणापासी कागदाच्या तालिका अगर मोरस्वरभटाचे हातीचा कागद व साक्षी ऐसी नाही ह्णणऊन सदरहूचे साक्षीनी बोलिला आणि तक्रीर केली की कागद दिल्हे ऐसे साक्षीनसी खरे करून देऊ तरी या उपरि तुमचे रुजू काय धरावे तेव्हा नामुकरादीस जाऊन आपण साक्षी नाहीत ऐसे बोलिलो नाही ह्मणून पचाइतापासी विनति करून मागती तक्रीरेस पुरवणी लेहून दिल्ही बितपसील

तकरीर कर्दे सदासिवभट बिन भानभट गिजरे वास्तव्य क-हाड तकरीर केली ऐसी जे क-हाडहून गोपालभट सातारियास येतेसमई श्रीच्या देवालयामधे आपणासी व त्यासी बोलणे जाहले की तुमच्या दानपत्राची तालिक व पिलभटाच्या पत्राची तालिक व मोरेश्वरभटाचे हातिचा कागद ऐसे आणिले तरी आपणास दाखवणे साक्षी आसिले तरी सागणे त्यास आपण बोलिलो जे आपणापासी दो पत्राच्या तालिका नाहीत मोरेश्वरभटाचे हातिचा कागद नाही ऐसे आपण बोलिलो त्यास गोपालभट मागती रात्री बाबदेवभटाच्या घरास येऊन गृहपतीची शफत करून करून आपण तुह्मासी कृत्रिमे बोलत नाही कागदाच्या तालिका अगर मोरेश्वरभटाचे पत्र अथवा साक्षी दाखवा ऐसे पुरुषोत्तमभट आफले व धोडभट वालिबे याच्या साक्षीने बोलिलो त्यास बाबदेवभट बोलिले की दोघ भलते ग्रहस्त बैसोन तुमचे व आमचे लिहिले होऊन ते समईं जे बोलणे ते बोलो येथे बाजारी बोलण्यामधे काये आहे ऐसे बाबदेवभट बोलिले त्यास गोपालभट ह्यणताती की साक्षी अगर तालिका मोरेश्वरभटाचे हातिचा कागद ऐसे नाही ह्मणऊन उभयेताचे गुजारतीने बोलिले हे खरे करून देऊ तरी येणेप्रमाणे उभयेतानी साक्षी दिल्ही तरी आह्मास बोलावयास समध नाही आपण सर्व आन्याई याखेरीज दादभट ढवलीकर व दाजी कदम याचे गुजारतीने हि येणेप्रमाणे च बोलिलो ह्मणताती तरी उभयेता भट गोसावी यानी साक्षी दिल्ही त्याचप्रमाणे ह्या उभयेतानी हि साक्षी दिल्ही ह्मणिजे आपण अन्याई बोलावयास समध नाही हे लिहिले सही तारीख ११ माहे साबान

येणेप्रमाणे दुसरी तकरीर सदासिवभटानी केली ते पचाइतानी वाचून पाहिली आणि त्यास पृछा केली की तुह्मापासी कागद जुनेपाने बहुता दिवसाचे वतनाचे भोगवटियाचे आसले तरी पचाइतापासी आणून ठेवणे त्यास सदासिवभट बोलिले को आपणापासी कागद दोनी होते ते आपला बाप भानभट यानि मोरेश्वरभटास श्रीमहादेवाचे स्थली दिले बिता।

रामेश्वरभटाचे नावाचे दान पत्र               पितभटाचे नावाचे मुतालिकाचे
येक १                                             पत्र येक १
येकून पत्रे दोनी होतीं ते दिल्ही याखेरीज वतनी कागद नाहीत ह्मणून पचाइतापासी कतबे लेहून दिल्हे
बितपसील