Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

या विद्यमाने शके १६४५ शोभकृत नाम सवत्सरे जेष्ठ शुध दशमी भानुवासरे तदिनी वेदमूर्ती नारायेणभट बिन वीरेश्वरभट गोपालभट बिरुद्रभट गिजरे जोतिषी मौजे कारवे व मौजे वडगाव व मौजे सेरे व मौजे दुसेरे व मौजे कोडोली प्रा। क-हाड यास लेहून दिल्हे निवाडपत्र ऐसेजे तुह्मामधे व सदासिवभट बिन

भानभट गिजरे क-हाडकर यामध्ये सदरहू गावीचा जोसीपणाचा कथला लागून पचाईतमुखे निवाडियास स्थल मजकुरास आला त्यास पचाइतानी उभयेतास बोलवून करीना मनास आणून तकरीरा लेहून मागितल्या त्यावरून तुह्मी उभयेतानी तकरीरा लेहून दिधल्या बितपसील

तकरीर- कर्दे सदासिवभट बिन भानभट गिजरे आग्रवादी वास्तव्य क्षेत्र क-हाड लेहून दिल्हे ऐसे जे मौजे सेरे व मौजे वडगाव - व मौजे कारवे व मौजे दुसेरे व मौजे कोडोली प्रा। क-हाड सदरहू पाचा गावीचे जोतीष कुलकरणि याचे घरीचे उपाध्यपण आपले पुरातन आहे वडिल खात आले आहेत त्यास काही दिवस मुतालिक ठेऊन वृत्ती अनभवीत आलो पहिले वृत्ति गगाधरभट पानसे याचे जोतिष व कुलकरणियाचे घरीचे उपाध्यपण होते तेश्रीवाराणसीस जातेसमई आपले पूर्वज रामेश्वरभट गिजरे यास दानपत्र करून सदरहू वृत्तीचे पत्र करून दिल्हे त्यावरून अनुभवीत होतो त्यास काही दिवस मुतालिक स्वामित्व देत आले सापृतकाले मुतालिकानी स्वामित्त्वास विक्षेप केला त्याउपरी कजिया प्राप्त जाला त्यास दिवाण व गोतमुखे निर्वाह करून घ्यावा तरी राजीक आनकूल पडिले नाही त्याउपरी राजश्री भानजी गोपाल सुभेदार प्रा। क-हाड याचे घरी मोरेश्वरभट होते त्यानी गिजरयाची वृत्ती ह्यणऊन प्रसग केला त्यास भानजीपत बोलिले जे गिजरे याची वृत्ति ह्मणता तरी त्याचे कागदपत्र काही आश्रये आहे की काये याउपरी आपले आजे कृष्णभट यासि मोरेश्वरभट यानी पुसिले की आपण सुभेदारासी बोलिलो गिजरेयाची वृत्ति मुतालिक खाताती याचा वृत्तात काये तो कलला असेल तो सागणे त्याउपरि कृष्णभटानी सागितले की भानभटास पुसणे ते सागतील त्यावरून भानभटास मोरेश्वरभटानी पुसिले त्यास उत्तर दिल्हे की आमची वृत्ति खरी कागदपत्र आपणाजवली आहेत आपण खरे करून देऊ त्यास