Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

मोरेश्वरभट ह्यणो लागले कीं कागद आपले द्रिस्टीस घालणे ह्यणिजे आपण बोलिलो तो गोस्टी भानजीपतापासी खरी जाहली त्यास भानभटानी बरे तुह्मास पत्रे दाखऊ त्यास कधी पत्र दाखविता ते काये सागणे त्यास श्रीमाहादेवाच्या यात्रेस आह्मीही येतो तुह्मी तेथे या पत्रे दाखऊ त्यास तेही श्रीच्या यात्रेस आले आह्मी आलो परंतु समागमे पत्रे आणिली नाहीत त्यास मोरेश्वरभटी अतिशये केला की सुभेदार या प्राती आपण लटिके होतो कागद अगत्यरूप दाखविणे त्यावरून उमाभट परिचारक यासि रुपये ३ तीन कबूल करून कागद श्रीपढरीहून आणविले आणि मोरेश्वरभटास दाखविले ते कागद आपणाजवली द्या ह्मणऊन मोरेश्वरभटीं मागून घेतले की भानजीपत यासि दाखऊन सवेच आणून तुमचे तुह्मास देऊ ह्मणऊन आपणाजवलील पत्रे घेतली ते साक्षीमोझ्या नसी आपण मोरेश्वरभटापासी दिल्हे आहेत हे खरे करून देऊ ते पत्रे आह्मास फिराऊन' दिल्हीं नाहीत रामेश्वरभट आमचे पूर्वज आपली वृति आहे हे खरे करून देऊ पिलभट याच्या' नावाचे मुतालिकाचे पत्र येक व रामेश्वरभटाच्या नावाचे दानपत्र येक ऐसी दोनी पत्रे दिल्ही हे सत्य रामेश्वरभटाच्या याचे इनाम- इजारती - कसबे मजकुरी त्याचा भोगवटा आमचा आहे आणखी हि वृत्तीचा भोगवटा दाखऊन आमची वृत्तिसमधे पत्रे व फर्मान आदिकरून पत्रे राजकामधे गेली सपूर्ण गाठोडे च गेले हे समस्तास ठाऊके च आहे मरलीकर व दुसेरेकर आह्मी त्रिवर्गाचा मूलपुरुष येक ऐसे खरे करून देऊ न देऊ तरी वृत्तीस समध नाही गोताचे आन्याई हे लेहून दिल्ही तकरीर सही छ १० माहे शाबान