Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १०४
१६४० फाल्गुनवद्य ९

श्री

मशरुल अनाम देशमुख व देशपांडे कर्यात दुधगाऊ पा। हुकेरी यासी कृष्णाजी विठल सुहुरसन तिसा असर मया अलफ हुजुरून या प्रातीचे चौथाई हुजूर बाबतीचा कार्यभाग आह्माकडे सागितला आहे या करिता आह्मी आपले तर्फेने राजश्री शिवाजी केशव व रा । राघो विस्वासराऊ यासि त्या प्राते धदा सागोन पाठविले आहे ये विसी राजपत्रे हि सादर आहेत तरी तुह्मी मा।रनिलेसी रुजू होऊन का । मा।रचा तहरह करून ये तर्फेचा वसूल सुरलीत देत जाणे आणि ता। मजकुरास अजार न लागे ते गोष्ट करणे जाणिजे छ २२ रबिलाखर