Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १०२
१६४० पौषशुद्ध ३ शनिवार

श्री

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४५ विलबीसवत्सरे पौशशुध त्रितिया मदवासर क्षेत्रियेकुळावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी वेदमूर्ती समस्त ब्राह्मण क्षेत्र कराड यासी दिल्हे ईनामपत्र ऐसेजे तुह्मी स्वामी सनीध श्री माहादेवचे मुकामी येउन विदित केले जे मौजे सैदापूर उर्फ सीवापुर ता । हवेली कराड हा गाव समस्तास कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व ईनामदार देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरु- काष्टपाषाणानिधी-निक्षेपआदी करून पडले पान चतुःसीमापुर्वक पूर्वमर्यादे प्रमाणे ईनाम पूर्वी करून दिल्हा आहे तेणेप्रमाणे चालत होते त्यास अलीकडे मुलुकात ताब्राची आमदानी जाहाली होती त्यामुले निमे वसूल त्याजकडे द्यावा अैसे जाहाले होते परतु त्यास ही पत्रे दाखविली सदरहू प्रमाणे त्यानी आपली पत्रे करुन देऊन चालवित होते प्रस्तुत महाराजाच्या स्वराज्यातील मोगल जाऊन अमल उलटा आण दुतर्फा अमल माहाराजाकडे जाहाला तर स्वामीनी दुतर्फा देखील मोगलाई एैवज जाहागीरदारी व फौजदारी व सायेर वगैरे बाब कुलबाब कुलकानू आपणास नूतन पत्रे करुन देऊन चालविले पाहिजे ह्यणून त्या वरून मनास आणिता तुह्मी थोर सत्पात्र क्षेत्री राहून श्रानसध्यादिशटकर्मे आचरोन. स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितोन आहा तुमचे चालविलेया श्वामीस श्रेयस्कर जाणून स्वामी तुह्या समस्तावरी कृपाळु होऊन मौजे मजकूर कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व कदीम ईनामदार देखील मोगलपटी व जाहागीरदारी व फौजदारी व किलेदारी व सायेर वगैरे बाब व हालीपटी व पेस्तरपटी जलतरुत्रृणकाष्टपाशाणनिधीनिक्षेपआदी करून पडले पान चतुःसीमापूर्वक पूर्वमर्यादे तुह्मास व तुमचे पुत्रपौत्रादिवौशपरंपरेने अग्रहार सर्वमान्य करून दिल्हा असे तर सदरहू प्रमाणे तुह्मी समस्त वौशपरपरेने,ईनाम अनभऊन सुखरूप राहाणे लेखनालकार

रुजू सुरु                    सा।
निवीस                      मत्री ,
: तेरीख १


सफर सु।। तिसा बार सूद सुरु सूद बार बार