Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १०१
१६४० पौषशुद्ध ३ शनिवार
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४५ विलबी सवत्सरे पौष्य शुध त्रितीया मदवासरे क्षत्रियेकुलावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत क-हाड यासि आज्ञा केली ऐसी जे समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड याणी स्वामी समीप येऊन विनती केली की मौजे सैदापूर ता। हवेली प्रा। मा। हा गाव कुलबाब कुलकानू आपणास अघ्रार इनाम सर्वमान्य आहे तेथील उत्पन्नावरी योगक्षेम चालऊन श्नानसध्यादिक उपसर्ग लागला आहे तो न लागे ऐसी आज्ञा केली पाहिजे ह्मणोन त्यावरून क्षेत्रस्त ब्राह्मण थोर सत्पात्र याचे अविक्षेपे चालवणे स्वामीस अगत्य यानिमित्य मौजे सैदापूर ऊर्फ सिवापूर ता। हवेली प्रा। मार देखील मोगलपटी कुलबाब कुलकानू इनाम करार करून दिल्हा आहे समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड यास पुत्रपौत्रादिवंशपरपरेने चालवणे आणि ब्राह्मण सत्कर्माचरण करून स्वामीचे कल्याण चितून सुखरूप राहात असे करणे मोगलपटीचा वगैरे उपसर्ग येकजरा न करणे यापत्राची प्रती लेहून घेउनु हे मुख्य पत्र भोगवटियास देणे जाणिजे लेखनालकार
रुजू सुरू सा ।
निवीस मत्री
बार सुद सुरू सुद बार बार