Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १०८
१६४४ चैत्रवाद्य ५ सोमवार

श्री

श्री सकलगुणमडित अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजेश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी प्रा। क-हाड गोसावी यासी श्रीकराच्यार्ये पडित आसिर्वाद राज्याभिषेकशके ४८ शुभकृत नाम सवत्सरे चैत्र बहुल पचमी इदुवासरे मौजे सैदापूर पा। क-हाड प्रा। मजकूर हा गाव राजेश्री कैलासवासी स्वामीनी समस्त ब्राह्मण क्षेत्र कसबा क-हाड यास सर्वमान्य अग्रहार ईनाम देऊन पर्याय नाम सिवापूर ह्मणून ठेविले ऐसीयास त्याकाली पामारीचे देशमुखी व सरदेशमुखी राजेश्री कैलासवासी याणी रा। राजा कर्ण याचे स्वाधीन केली होती त्याणी क्षेत्रीचे ब्राह्मण भले विद्यावत व ब्राह्मणसमूहास हि विशेष व क-हाड क्षेत्र बहुत थोर कृष्णातीर पुराणप्रसिद्ध यास्तव त्याणी देशमुखी सरदेशमुखीचे हकदारी मौजे सिवापूर आग्रहारीची समस्त ब्राह्मणास धर्मादाय दिल्हा आणि पत्र दिल्हे जे सदरहू हकदारी तुह्मा समस्त ब्राह्मणास पुत्रपौत्रादि दिल्ही आहे ते भक्षून राजेश्री छत्रपति स्वामीस व राज्यास कल्याण चितून सुखरुप असणे ह्मणून पत्र दिल्हे व वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट बिन विश्वनाथभट गिजरे यास सदरहू अग्रहार पैकी श्री कृष्णानदीस नित्याभिषेक करावया बद्दल भूमी ईनाम बिघे. तीस बीघे आह्मी नेमून दिल्हे त्याचे हकदारी वेदमूर्तीस देऊन त्याचे पत्र अलाहिदा दिल्हे व वेदमूर्तीचे ईनाम सदरहू तीस बीघीयाची हकदारी रा। रुद्राजी चदो देशकुलकर्णी पा। मा।र याणी आपली वेदमूर्तीस दिल्ही आणि आपले पत्र दिल्हे ऐसियास क-हाड ह्मणजे कृष्णातीर बहुत थोर क्षेत्र पुराणप्रसित्ध विख्यात तेथे ब्राह्मणसमुदाय बहुत व ब्राह्मण विद्यावत अग्निहोत्री आहेत वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट हे पुरातन राजेश्री छत्रपतीचे तीर्थपुरोहित यास्तव अग्रहारमा।रीचे देशमुखी सरदेशमुखीची हकदारी राजेश्री राजा कर्ण याचे पत्रा प्रा। समस्त ब्राह्मणास चालवणे व उभयचा वेदमूर्तीस सदरहू तीस बिघे ईनामाचे देशमुखी व सरदेशमुखीची हकदारी व देशकुलकर्णसबधी हकदारी रुद्राजी पताचे पत्रा प्रा। सुरक्षित चालवणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रति लिहून घेऊन मुख्य पत्र उभयता वेदमूर्ती पासी परतून देणे छ ३ जमालिखर सु।। इहिदे अशरीन मया अलफ हे आशीर्वाद

बार