Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९८
१६३७ चैत्रशुद्ध ४ रविवार
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४१ मन्मथनाथ सवत्सरे चैत्र सुध चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शभु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रात कराड यासि आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती मोरेश्वरभट गिजरे याणी पनालाचे मूकामी स्वामी सनिध येऊन विदित केलें की राजश्री थोरले कैलासवासी स्वामीनी क-हाडक्षेत्र सनिध कृष्णाकोइना येथील आपले तीर्थपुरोहितपण आपले पिते विश्वनाथभट यास वृती करून देऊन पत्र दिल्हे तदनुरूप कैलासवासी स्वामीनी हि तीर्थपुरोहितपणाचे पत्र दिल्हे व उभयता नदीचा नित्याभिषेक सागोन त्यास मौजे शिवापूर पा। मजकूर या गावपैकी इनाम भुमी बिघे ।तीस देऊन पत्र दिल्हे आहे तेणेप्रमाणे स्वामीनी हि आपणास उत्तरोतर चालवावा विंशई भोगवटियास पत्र दिल्हे पाहिजे ह्मणून विदित केले व तीर्थस्वरूप कैलासवासी स्वामीचे पत्र आणून दाखविले त्यावरून हि कळो आले ऐशास हे भले ब्राह्मण सत्क्षेत्री स्वामीचे पुरोहितपण थोरले कैलासवासी पासून व कैलासवासी स्वामीपासून करीत आले आहेत त्याप्रमाणे तीर्थपुरोहितपण व कैलासवासी स्वामीनी उभयता नदीचा नित्याभिषेक सागोन मौजे मजकूर पैकी तीस बिघे इनाम दिल्ह्याप्रमाणे चालविणे हे स्वामीस अवश्यक व तेणेकडून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण आहे याकरिता तुह्यास हे आज्ञापत्र सादर केले आहे तरी तुह्मी कैलासवासी स्वामीच्या पत्राप्रमाणे तीर्थपुरोहितपण व उभयता नदीचा नित्याभिषेक व यास मौजे शिवापूरपैकी इनाम जमीन बिघे तीस ऐसे मोरेश्वरभट गिजरे यास पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालवणे नवीन पत्राची अपेक्षा न करणे या पत्राची प्रत लेहून घेऊन मुख्यपत्र भोगवटीया निमित्य वेदमूर्तीजवळ परतोन देणे लेखनालकार
रुजू सुरू सुद बार