Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४७ १६८२
कारकीर्द अमल पातशाही जाल्या पा। सुपे व बारामती कर्यात पा। मा। सा। जुनर
अमल निजामशाही
दस्तुरखान अमल सन सबा समानीन तिसा मया एकूण अर्बी सन ९८७ याचे हिजरी मोगली सन ९९६
१
अमल याकूदखान मोकासाई सन इहिदे इशरीन अलफ सन १०२१ एकूण हिजरी सन १०३०
२
सुभा अमल बडे मलिक नि॥ दौलताबाद प्रा। मजकुरी आले व सिदी बिलाल व फरोज यासी जागीर पा। मजकुरी देह २१ जाली त्यानी कर्यात बारामती केली सु॥ सन १०३१ ता। १०३२
३
त्यावरी हैबतखान व लखो बाबाजी हवालदार अमलदार जाले ता। सन १०३३
४
अंमल एदिलशाही
अलीखान व सरफराजखान सन १०३४
५
अमल शाहाजीराजे भोसले यास जागीर जाली पा। पुणे व पा। सुपे दादाजी कोंडदेव पा। पुणे सुपियाकडे अमलदार पाठविले त्यांची नांवे
१ हणमंतराव साठे
१ त्यावरी हैबतराव
१ त्यावरी सरनवाजखान
१ त्यावरी खेळोजीराजे भोसले
१ त्यावरी एकोजी मोहिते
सु॥ सन खमस सलासीन अलफ
हिजरी सन हजार १०४४ ता।
-------
५
६
याउपरि राजश्री सीवाजी राजे या प्रांती राहिले ते समई सुपियांत संभाजी मोहिते हवालदार व दादाजी रखमांगद मजमदार होते ता। सन हजार १०६७ सुपियांत १
बारामतीस कान्हो पद्मनाभ हवालदार इ॥ सन १०६१ ता। सन हजार १०६७ - १
७
त्यावरी पुढे सीवाजी राजे यानीं संभाजी मोहिते धरिले मुलूक घेतला ठाणे बैसविले यादो सिधनाथ हवालदार व चोंडाजी व एसाजी गणेश हवालदार सन हजार १०६७
८
यावरी अबजलखान याने सीवाजी राजियावरी मोहीम केली त्याची ठाणी उठऊन आपले ठाणेदार पाठविले सिदी बिलाल व पांढरे सन १०६८ ता। सन १०७०
९
अमल मोगलाईच्या नामजादी दिल्लीहून आपल्या अमीरल- उमराऊ शास्ताखान आला ते समई मुलूक तमाम वोस जाला सुभा जेजुरीस आला तेथून चाकणेचा किला सर केला त्यावरी सिदी बिलाल सुभा करून आपले तरफेने ठाणियास पा। त्याने कौल देऊन कोट सुपियात मुस्तेद केला आपण मग इंदापुरास गेला राघो माहादेव हवालदार ठेविला सन हजार १०७१
१०
त्यावरी शास्ताखानाने सरफराजखान पुणियाहून नामजाद पा। बारामतीस सिदी बिलाल याणे ठाणे बैसविले जागीर देह २१ माणको बल्लाळ हवालदार व एसो नारायण मजमूदार सन १०७२
११
त्यावरी मिर्जा राजा आला सु॥ सीत सितैन अलफ हिजरी सन हजार १०७५ ते समई खिदरखान याणी ठाणे अकळूजेस बैसविले बारामतीस मानुल्लाखान आला कोट बाधला शके १५८७ विश्वावसु संवछरे सन हजार १०७५
१२
त्यावरी सीवाजी राजियानी धामधुम केली पुरंधरीहून स्वारिया करून मुलूक वोस पाडिला बेचिराख केला त्यावर दलेलखान व बाहादूरखान आले यानी पेडगावी कोट बांधला मुलूक वोस पाडिला ता। सन १०९२
१३
त्यावरी हजरत अलमगीर पातशाहा खासा दक्षणेस आले सन हजार १०९३ त्यावरी बारामती ठाणेदार जाले नावनिसी बि॥
१ हणमंतराव निंबाळकर सन हजार
१०९३ ता। सन हजार ११०३
१ यासीनखान सन हजार ११०४
ता। सन हजार ११११
१ सिलेमानखान सन हजार १११२
ता। सन १११३
१ यासीनखान मागती बदल जाहाले
सन १११४ ता। सन ११२०
१ रमाजी निंबाळकर यासी जागीर
सन ११२१ ता। सन ११२८
पावेतो
-------
५
१४
याउपरि अमल स्वराज्य जाले सन हजार ११२९
१ नारो प्रल्हाद छंदोगामात्य
इ॥ सन ११२९ ता। सन
११३२
१ हरि यादव सन ११३३
ता। सन ११३४
१ चिमणाजीपंत धायगुडे सन
११३५ ता। सन हजार ११३७
१ राजश्री पंत सचिव सन ११३८
ता। सन ११५२
१ रा। बाबूराव सदाशिव सन ११५३
ता। हाली सन ११६९ आहेत
१५