Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

एणेप्रमाणे सातजण जाऊन विचार करून मुचलका लेहून आणिला मजकूर

बो। यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक देशपांडे पा। सुपे सु॥ ११३२ सन सलास अशरैन मया व अलफ कारणे कतबा लेहून दिल्हा ऐसा जे पा। मजकूरचे देशपांडेपण दरोबस्त आपलें आहे नारो केशव व बाबूराव रामजी हे देशपांडे नव्हेत यास देशपांडेपणासी समंध नाही हे आगांतुक भट होत याचा व आपला मूळपुरुष एक नव्हे ऐसे साबूत करून देऊन न देऊ तर आपणास वतनासी समंध नाही वतना निराळे होऊन हे लिहिले सही छ २१ जिलकाद

सदरहूप्रमाणें मुचलका लेहून दिधलियावरी सभानाईक माहाप्रश्निक यानी पुरसिस केली की तुमचा मूळपुरुष एक नव्हे ऐसे ह्मणता तरी तुह्मी यातीचे ब्राह्मण आहा ब्राह्मणास आचार प्रमाण याचे तुह्मी सुतक धरीत आले आहा की नाही हे सांगणे ऐसें पुसता अग्रवादेमजकूर उत्तर देता चावळो लागले घडीभर ह्मणत की संभाजी मोहित्याचे कारकीर्दीपासून सुतक धरितों घडिभर बोलत की धरीत नाही मग बोलिले की श्नान मात्र करीत असो घडीभर आपणामध्ये परस्परे कलवडो लागेत की हा देवाजी त्रिंबक त्यास मिळाला होता हा धरीत असे यादो रखमाजी बोले की आपण धरिले नाही आपण श्नान मात्र करीत असे तेव्हा सभानाइकानी पुसिले की श्नान तर्‍हिकाय निमित्य करीत असा त्यास उत्तर दिल्हे की काश्यपगोत्री ह्मणून तेव्हा पुसिले की सुपियामध्ये काश्यपगोत्री गृहस्थ आणित होते त्याचे नावे श्नान का करित नव्हता त्यास उत्तर दिल्हे की हे व आपण एके जागा सांगाते कारभार करीत असो ह्मणोन श्नान करीत होतो परंतु घरी एऊन सावकाश जेवीत असो त्याउपरि पुसिले की सुतकामधे जेऊ नये उपास करावा ऐसे कोण्हे शास्त्री आहे अगर दुनियामध्ये उपास करावयाचा कोठे दंडक तर्‍ही आहे की काय अथवा पराव्याबराबर एके जागा कारभार केला ह्मणजे उगे च सुतक धरावे ऐसे तर्‍ही कोठे कोण्हे शास्त्री ऐकिले आहे अथवा कोण्ही करीत तर्‍ही आहेत ते सांगणे ऐसी पुरसिस करिता सभेपुढे उत्तर देता चावळो लागले मग सभानाइकानी दटाऊन बोलिले की उत्तर माकूल देणे नाही तर फजित पावाल काय असेल ते यथार्थ सांगणे सुतक धरीत आला असिलेस तरी कबूल करणे नाही तर मुनकीर होऊन मुचलका लेहून देणे की तमाम परगणा जमा जाला आहे यानी सुतक धरीत होता ऐसी ग्वाही दिल्ही तर आपणास कुल भावाबदानसी याती निराळे घालावे ऐसे पष्ट वादे पुसता मुलजीम होऊन आपल्या मुखे एकरार केला की होए सुतक धरीत होतो यावरून अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक खोटे जाले मूळपुरुष एक नव्हे ह्मणत होते ते तकरीर लटिकी तुफान असे दिसोन आले हरदूजण दायमुदये याचा मुळपुरुष एक होए परस्परें भाऊबंद होत देशपांडेपणाचे खावद खरे ऐसे समस्त सभेच्या मते जाले त्यावरी अग्रवादेमजकूर याणी दुसरा कजिया काढिला की आपण वडील भाऊ वडील घर आपले त्यावरी सभानाइकानी पुरसिस केली की वडिलपणाच्या सनदा तुह्माजवळ काय आहेत ते जे वडिलपणाचा दावा करीता त्यास त्याणी उत्तर दिल्हे की ज्या सनदा बाबूरायाने फर्मान वगैरे प्रसगी टाकिल्या आहेत त्या सनदा आमच्या आहेत परतु यानी च बळकाऊन आपणाजवळ ठेविल्या आहेत ऐसे ह्मणता सदरेचा हुकूम जाला की तुमच्या च तकरिरेवरून कजिया फैसल जाला की या सनदामध्ये जैसी नावे असतील त्याप्रमाणे वर्तणूक करणे तेव्हा अग्रवादे मजकुर बोलिले की वाबूरायाचा बाप रामाजीपत काबील होता त्यानी अवरगाबादेस पताजी बोकिला सी वाद करोन खोटा केला आणि ते समई फर्मान पेश अज जुलूस बमोहर हजरत हासील केला तेव्हा आमचा राजो सखाजी त्याजबराबर नेणता होता आणि रामाजी बाबाजीने प्रपच करून नावे आधी विठल माहादेव व त्यामागे त्रिबक गोमदेऊ ऐसी घातली त्यावरी सभानायक माहाप्रश्निक यानी आपले जागा कयास करून नफरमजकुरास पुसिले की राजो सखाजी नेणता होता याकरिता रामाजी बावाजीने प्रपच केला परतु गावास सनद आणिलीयावरी गावी तो तुमचे कारभारी काबील जाणते होते त्यास सनदेचा भोगवटा कैसा चालिला आहे तो जाहीर करणे त्यावरी अग्रवादेमजकूर बोलिले की भोगवटियाचे साक्ष तमाम मोकदम परगणाचे वगैरे कदीम वतनदार माहाराज साहेबी जमा करून आणिले आहेत त्यास ठाऊके आहे ते जैसी शाहिदी देतील त्यास आपण कबूल असो त्यावरी तमाम देसक से सवासे मोकदम वृध वृध मातबर वतनदार उभे करून राजश्री स्वामीनी आपले स्वमुखे बेताळीस पूर्वजाचे सत्यसुकृताची शफथ घालून पूसिले की वडिलपणाचा भोगवटा कैसा चालत आला आहे तो यथार्थवादे सत्य स्मरोन सागणे ऐसे पूसिले त्यावरी तपसिले नावे लिहिली आहेत तेणेप्रमाणे तमाम मोकदम कदीम वतनदार पा। मा।र याणी साक्ष दिल्ही की नारो केशव व बाबूराव रामाजी याचे वडील माहादो लखमदेव त्याणी वडीलपणे कारभार केला त्यासमागमे यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक याचे वडील विष्णु हरदेव त्याचा पुत्र हरि विष्णु उभयतानी धाकुटपणे वतन खाऊन वर्तणूक केली आहे त्यावरी विठल माहादेव याणी वडिलपणाचा कारभार केला त्यामागे त्रिबक गोमदेव देवाजीपताचा बाप धाकुटपणे वर्तला आहे त्यावरी रामाजीबावानी बाबूरायाचे बाप त्याणी वडिलपणे कारभार केला त्यामागे त्रिबक गोमदेव देवाजीपताचा बाप धाकुटपणे वर्तला आहे त्यावरी रामाजीबावानी बाबूरायाचे बाप त्याणी वडिलपणे कारभार केला त्यामागे देवाजी त्रिंबक व रखमाजी यादव धाकुटपणे वर्तले आहेत त्यावरी रामाजीपतामागे बाबूरायानी कारभार वडिलपणे केला आधी मान पान नाव दसकत व तसरीफ बाबूराव घेत गेले आहेत त्यामागे देवाजी त्रिंबक व यादो रखमाजी धाकुटपणे तसरीफ घेत आले आहेत एणेप्रा। पिढी दर पिढी भोगवटा आहे वडील घर दसकत तसरीफेचे खावद नारो केशव व बाबूराव रामाजी होतेत व धाकटे घर यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक याचे होए ऐसी शाहिदी समस्तानी दिल्ही त्यावरून अग्रवादेमजकूर वडीलपणाचा दावा करीत होते ते खोटे जाले वडील देशपाडे दसखत व तसरिफेचे खावद नारो केशव बाबूराव रामाजी खरे ऐसे देशकाचे शाहिदीवरून अग्रवादियाचे एकरारावरून व भोगवटियावरून करार जाले ऐसा इनसाफ जालियावरी सभानाइकानी अग्रवादे यादो रखमाजी व देवाजी त्रिबक यास पूसिले की वडील देशपाडिया कोण व धाकटे घर कोण्हाचे तेव्हा मशारनिलेनी धर्मसभे हुजूर सारे दरबार तमाम देसका देखता आपले जबानी तीन वेळा एकरार केला की आपले वडील मान पान व दसखत व तसरीफेचे खावद नारो केशव बाबूराव रामाजी होत आपण माघारे आपले घर धाकटें ऐसा तीन वेळा एकरार केला त्यावरी सदरेचा हुकूम जाला कीं नारो केशव व बाबूराव रामाजी यास एजितखत लेहून देणे त्यावरून एजितखत तमाम देसक व हालीमवाली याचे शाहिदीनसी अग्रवादियानी लेहून दिल्हें असे सदरहूप्रा। इनसाफ करितां धर्मसभे हुजूर व देशका देखता यादो रखमाजी व देवाजी त्रिंबक खोटे जाले व नारो केशव व बाबूराव रामाजी खरे जाले याकरिता मशारनिलेस वादाच्या मुनसुफीचे पत्र करून दिल्हे असें की निवडिलिया करान्याप्रा। पा। सुपेबारामती एथील देशपांडेपण व कसबे सुपाचे कुलकर्ण वगैरे कुलव्रतने वडीलपणे खाऊन वडीलपणाचा लवाजिमा मानपान नावतसरीफ आधी घेत जाणे व दसखत आधी करीत जाणे मशारनिलेमागे यादो रखमाजी व देवाजी त्रिबक याणी धाकुटपणे वर्तोन आपलें देशपांडेपण करावे अग्रवादेमजकुराजवळ दस्तूरखानाच्या वेळेच्या महजराची लिबासी दोमोहरी खोटी नकल होती ते वगैरे झूट्या सनदा होत्या त्या कुल रद करून फाडून टाकिल्या असेत सानीनहाल त्याची प्रती निघाली कोठे तरी झूटी गलथ असे नारो केशव व बाबूराव रामाजी यानी आपले वडीलपण सुखरूप वंशपरंपरेने पिढी दर पिढी अनभऊन देशपांडेपण वगैरे वतने कुल आपली खाऊन सुखरूप असणे हे जयपत्र लिहिलें सही छ २६ रोज माहे जिलकाद श्रावण बहुल त्रयोदसी इंदुवासर श्रीनृपशालिवाहानशके १६४४ सुभकृतनामसंवत्सरे

बलूत्याच्या सह्या निशाण्या

इ. इ. इ.