Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्यामागे माहादपंताचा लेक विठलपंत कारभार करूं लागला त्याबराबर त्रिंबक गोमदेऊ करूं लागले करीत असतां नवाब अमीरलउमराऊ शास्ताखान साहेब सुबा पुणियासि आले ते वख्ती बहिरो नारायण वादिया उभा राहिला की प्रा। सुपांची देसपांडगिरी आपली आहे त्यावरून विठ्ठल माहादेऊ व त्रिंबक गोमदेऊ ते हि हजूर नवाबसाहेबाचे बादगीस गेले तेथे हकीकती जाहीर केली त्यावरी कचेरीवर इनसाफ टाकिला कचेरीस कुल मुतसदी बसोन मनास आणिता ना। मा।स पुसिलें की तू उभा राहिलास तर तुझी सनद असनाद टाकणे तो ह्मणो लागला कीं सनद असनाद आपणाजवळ काही नाही व भोगवटा वरसे ७२ नाही ऐसी तकरीर केलियावरी विठल माहादेऊ व त्र्यबक गोमदेऊ यासि पूसिलें याही जाहीर केले की आपण काबीज मुतशरीफ आहो व सनद असनाद हि आहे सदरहू हकीकती मुतसदियानी नवाब अमीरलउमराव यासि जाहीर केली नवाबसाहेबीं फर्माविले की हरगाहा की काबीज मुतशरीफ बाहात्तर वरसे नाही आणि सनद असनाद हि नाही मर्द तुफानी आहे ना। मा।र दूर करून विठल माहादेव व त्रिबक गोमदेऊ यासि परवानीयाचा हुकूम केला की परवाना देणे त्यावरून परवाना मर्हामत जाला याउपरि रुकसत होऊन पा। मा।रास आले तो मागून सुबियाचा हुकूम आणिला की पा। मारी तहकीक करणे कुल परगणा जमा करून तहकीक करणे त्यावरून राजश्री नारोजी यशवंतराव व उदाराम वगैरे उमराव बैसोन परगणा मेळऊन तहकीक केले तेथे परगणाचे मोकदम जमा होऊन सांगितले की विठल माहादेऊ व त्रिबक गोमदेऊ याचे वडील देसपाडे तहकीक आहेत पिढी दर पिढी खात आले आहेत या वेगळा दुसरा कोण्ही नाही ह्मणून महजर करून दिधला माफीक महजर दुसरा परवाना नवाबसाहेबाचा घेतला याउपेरी सुबा मिर्जा राजा जाला त्याचा परवाना करून घेतला त्या उपरि हजरत पातशहाजादेसाहेब अलम औरगाबादेस साहेबसुबा जाला ते वख्तीं माहाराज राजश्री सीवाजी राजे याचा सलाह जाला आनदराऊ व प्रतापराऊ दाहा हजारा स्वारानिसी चाकरीस दिधले नीराजी राहूजी वकील हजूर औरगाबादेस राहिले ते वख्तीं अबाजी तुराफ वादिया याने पताजीपत सरकारकून याजवळ भीड देखोन त्यास सटाबटा करून राजश्रीजवळ पताजीपतानी जाहीर केले की सुपाचे देसपाडेपण आपले आहे साहेबी आपणास ते वतन दिधले पाहिजे त्यावरी राजश्री राजेसाहेब बोलिले की आपण वतनाचा कजिया मनात आणीत नाही हे काम औरगाबादेस साहेबसुबा हजरत बाहादूरशा आहेत तेथे जाऊन कजिया करून तेथे जो कजिया फइसल होईल तो आपणास मजूर आहे त्यावरून पंताजीपंती अंबाजी तुराफ औरगाबादेस पाठवि तेथे अमानताचा परवाना चाली लाविला तो खबर औरगाबादेहून मल्हार विठल गुमास्ता याणे लिहिली मग कासीद सुपियासि आला तो गगाजी मुद्गल हवालदार याचे कचेरीस विठल माहादेऊ व त्रिंबक गोमदेऊ व रामाजी बाबाजी व तिमाजी मल्हार कुळकर्णी कसबाचे करीत होते ते हि बैसले होते तो खबर एकाएकी च आली मग गगाजीपती कागद पाहोन बहुत कष्टी जाले वादिया सरकारकून जबरदस्त पडिला हे गरिबे ब्राह्मणे कैसे वतन राहेल हे न कळे मग चौघे जण तैसे च उटोन पठेतून कसबियात चालिले तो दरवाजियाजवळ त्रिंबक गोमदेऊ रामाजीपंतास ह्मणो लागले की रामाजीपतो तुह्मी वडील घरचे आहा वडीलपण खाता वतनावर सरकारकून जोरावर उभा राहिला याउपेर वतन कैसे राहेल ह्मणौन बहुत कमदिमतीने बोलिला मग रामाजी बाबाजी बोलिला की ऐकतोस त्रिंबक गोमदेव आपले घर वडील आहे वडीलपण करीत आलो आहो तर वादियास मारून बाहेर घालून आणि वतन राखोन तरी च तोड दाखवीन ह्मणौन बोलोन पेठेत राहिले