Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१ १६४२
तकरीरकर्दे पश्चमवादी बो। नारो केशव व बाबूराव देसपांडिये पा। सुपे सु॥ ११३० कारणे पंचाइताचे सेवेसी तकरीर लेहोन दिधली ऐसी जे आपणावर देवाजी त्रिंबक व यादो रखमागद दिवाण बहजूर राजश्री याजवळ उभे राहिले तकरीर केली जे आपले हरिविष्णूने मेगो कोतोचा कजिया जालियावर एकसे बत्तिसा वरसाअलीकडे भटपणाची तिसरी तकसीम सेभरा होनास १०० जाऊबास दिधली आणि अलीकडे देसपांडेपण व कसबेचे कुलकर्ण जबरदस्तीने खाताती ह्मणोन उभे राहिले त्यावरी त्यासी व आपणास पंचायत थळमजकूर नेमून दिल्हे मग आपण व वादेमजकूर साहेबाजवळ आलो त्यावरी गोतपंचाईत समस्त बैसोन आपणास फर्माविले की अग्रवादी देवाजी त्रिंबक व यादो रखमागद यानी आपली तकरीर लेहोन दिल्ही त्यावरी तुह्मी आपली हकीकती लेहोन देणे त्यावरी आपली तकरीर दिधली जे सदरहू भांडण आजितागाईत कधी भाडले नाहीत अगर आपले वडिली हि सागितले नाही अगर कधी याचे हि वडील आपल्या वडिलासी भाडले नाहीत आजितागाईत भाऊपणे आहो वडील भावाचे आह्मी धाकटे भावाचे देवाजी त्रिंबक व यादो रखमागद भाऊपणे निमे आपण व निमे आपणामागे सदरहू जण वतन देशपांडेपण व कुळकर्ण कसबांचे व भटपण जोतिष अष्टाधिकार का। मा। वगैरे वतन दो ठाई खात आलो आपले वडील वडीलपण नाव पान तहरीफ जो लवाजिमा वडिलपणाचा त्याप्रमाणे चालिले त्यामागे हरदोजणाचे वडील भाऊपणे चालिले तेणेप्रमाणे आपण चालिलो आणि आपणामागे सदरहूजण चालिले हाली राजश्री पंतप्रधान याजवळ हरदोजण उभे राहोन फिर्याद जाले की आपले वडीलपण आहे आणि आपणावरी जोरावरी करिताती मोगलाईच्या बळे मन माने ते खादले ऐसिया तुफाने तोतियाच्या गोष्टी बोलोन सासवडचे मुकामी फिर्याद जाले त्यावरी राजश्री पंतप्रधान याणी फर्माविले की आपण प्रस्तुत दिल्लीहून फिरोन आलो आहो राजदर्शन जालियावर या मुलकास फिरोन एऊन आणि मनास आणू ह्मणोन बोलिले त्यावरी राजश्री पंत हजूर सातारियास गेले त्यावर दो महिन्या उपरे परगणेमजकूरच्या कारकुनास व देसमुख व देसपांडिये व मोकदमास हजूर सातारियास जमाबदीबद्दल बोलाविले त्याउपेरी हजूर गेलो तेथे सदरहू जणी कजिया केला की आपले वडीलपण आहे मुचलका लेहोन बापूजीदतापासि दिधला आणि तकरीर मागता लेहोन दिधली की हरी विष्णूने जाऊबास भटपण तिसरी तकसीम सेभरा होनास दिधली आणि देसपाडेपण व कुलकर्ण व भटपण कसबाचे वगैरे वतन मोगलाईचे बळे खाताती ह्मणोन लेहोन दिधली