Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

ऐसिया उपरि आपणास सदरहू वादियासी पंचाईत तुह्मास राजश्री पंती दिधले त्यासी स्वामीने आपणास पुरसीस केली तरी याचे आपले भांडण आजितागाईत नाही मागे आपल्यावर बिराना वादिया ह्मणजे आपला वडील नागोपंत देसपांडिया व देसमुख ऐसे दर अमल निजामशाही मुलूक भागस्थळ होता ह्मणौन मौजे कोथळे प्रा। मजकूर तेथे तगटास गेले होते तेथे कोतावा व त्याचा लेक मेगावा ऐसे वाईदेसीचे ब्राह्मण सेतडिया मागत आले त्यासी आपले वडिली नागोजीपतीं पुसिले की तुह्मी काही लेहो जाणत असाल तरी तुह्मास लेहावयास ठेऊन त्यासी त्यानी ह्मटिले की आपण लेहो जाणत आहो चाकरी राहोन मग उभयता बापलेक चाकरीस यारिदीस ठेविले आणि कितेक रोज जाले तो कोतावा मेला मेगावा कारभार करू लागला व नागोपत मेले त्याचे पुत्र लखमो जनार्दन होते त्यासी मेगावाने जबरदस्तीने कारभार करिता कुल आटोप केला आणि आपल्या वडिलास बेदखल केले खावद च ह्मणो लागला आपले वडील गरीबे केलीं याउपेरी निजामशाही दस्तूरखान मोकासी होता खानमशारुनिले त्या जिल्यास गस्तीस आले होते ते समई आपले वडील लखमावाबावा माती खाणावयास गेले तो नफर मजकुराच्या बटकी हि माती खाणावयास आल्या त्यानीं कलागत करून उठवून वाटे लाविले मग सोसे ना ह्मणौन खान अजम दस्तूरखानाजवळ उभे राहिले कीं आपला गुमास्ता असोन... बेदखल वतनास करून सोडिले आहे तर आपला हक्कइनसाफ केला पाहिजे त्यावरी खानमाइलेने कुल परगणा बोलाऊन गीर्दनवाईचे जमीदार बोलाऊन काजी व देशमुख बोलाऊन बैसोन इनसाफ करून नफरमजकूर खोटा केला मग नफरमजकूर बाहेर घातला आणि देशपाडेपण व कसबाचे कुलकर्ण व जोतिश अष्टाधिकार आपले वडिलाचे हवाले केले खुर्द खत करून दिधले आतिण सदरहूप्रमाणे महजर करून द्यावयाचा हुकूम केला यावर लेहावयास कोण्ही नाही लेक माहादाजीपत लहाण आहे ह्मणौन खान अजम तुरकखानाचेथे विष्णु हरदेव चाकरी करीत होता तेथून आणिला आणि खानमा।इलेजवळ नेऊन उभा केला की आपला पुतण्या खान अजम तुरकखानाचेथे चाकर होता तो आणिला जो पावेतो आपला लेक दाहा बारा वरसाचा आहे तो थोर होय तो पावे तो नफर मजकूर आपल्या पुतन्या लिहील ह्मणऊन अर्ज केला त्यावरी खानमा।इले बोलिले की विष्णोवा गुमास्तेमजकुराचा सोईरा होए आणि याचे हाती कैसे लिहिणे देतोस त्यासी लखमावा बोलिले की सोईरा जाला तर काय जाले आपल्या पुतण्या आहे काय चिता आहे त्यावरी चौ पाचा वरसा माहादपत कारभार करू लागले त्यामागे विष्णुपत कारभार करू लागले नरहरपत जुनरी होते ते हि आले मग दोघे भाऊ जाले तो कितेका रोजा ममलकतमदार मलिक अबर साहेबाजवळ पुणेकर देसमुखदेसपांडिये सीवाचे झगडे पुणे देशात व सुपे देशात गावगन्ना आहेत याबदल फिर्याद जाले आणि प्रसंग केला ह्मणौन विष्णु हरदेव व जाऊ पाटिल ऐसे हजूर पाठविले तो जागीर खान अलीशान याकूदखान साहेबास मोकासा प्रा। मजकूर होता त्याजवळ गेलेती कोतोवाचा लेक मेगावा उभा राहिला ते खबर कळलियाउपेरि माहादाजीपत हजूर गेल जाऊन खान अजम याकूदखान साहेबाजवळ आपली हकीकती जाहीर केली खानमाइलें तैसा च आपला हेजीब बराबर देऊन मलिक साहेबाजवळ माहादपतास पाठविलें तेथे माहादपती आपले जबानीं कुल हकीकत गुमास्तेमजकुराची खान अजम दस्तूरखानाचे वेळेची जाहीर केली त्यावर इनसाफ करिता दरोग बातील दिसोन आलियाउपेरि दूर केला नफरमजकुरास खुर्द खत परवाना देविला आणि माहाली महजर करावयाचा हुकूम केला त्याउपेरी माहादपंत परगणेमजकुरास आले त्यावरी विष्णोपंताचा लेक हरिपत माहादाजीपताबराबर कारभार करीत होता व सखोपती हिं केला तों माहादपंत मेले