Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२७ श्रीमोरेस्वर १५३९ वैशाख शुध्द ५
तीर्थस्वरूप अखंडितराजलक्षेमी राजमान्य राजश्री माहादाजी गोसावी श्री वस्ती मोरगौ पा। पुणा स्वामी यासि सेवक राघोजी राऊतराऊ देसमुख तपेहाय उर्डी पौड
रूपाजी व काकाजी व मल्हारजी कुलकर्णी ता। पौड
बाजी नाईक व एसजी नाईक ढमाले
सुर्याजी व मोराजी देसाई
बाजी कृस्ण बापुजी दादो पोतदार तपे मा।र
बाजी व सीवजी पडील मोकदम मौजे सोरणी व मौजे बरस्ते
एस पाटिल व एसाजी थोरकुडे मौजे बारोली
+ + + पाटिल व चांदपाटिल मौजे वलणे व नाणोली
होनाजी व हिरोजी पाटिल मोकदम मौजे भादस बु॥
एण्हेप्रमाणे व समस्त प्रजा व मोकदम व कारभारी व कुलकर्णी मिलौनु व्रुतीपत्र लेहौनु दिधले की स्वामीस पुरातन आपले वाडवडीलातागाईत चालिले आहे त्यणे च प्रमाणे दर गावास + + + नखत रुके ॥ चोविस व गला भात मण .॥. ऐसे प्रतवरुसी देऊनु यासी आनिखे करील त्यास श्रीची आण असे व आपल्या पूर्वजांची आण असे प्रीतवरुसी आपले माणूस पाठऊनु सदरहू प्रमाण दर गावास घेत जाणे लेकराचे लेकरी अवलादी अफलादी चालउनु हे व्रुतीपत्र लिहिले सही सके १५३९ पिंगल नाम संवछरे वैसाख सुध पंचमी वार सोमवार ते दिवसी व्रुतीपत्र लेहौनु दिल्हे असे