Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

येणेप्रमाणे सनदा आहेत त्यास, सनदामधील तपसिल आहे की, कुलकर्णासी तालूक नाही, निविसिदे खरे, हक रयेतनिसबत देविला होता ह्मणोन सनद जाली, त्यास, तहकीकात करिता तो हि हक रयेतनिसबतीचा भोगवटा चालला नाही. →  पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

 

सदर्हू रामाजीच्या सनदा व शाहिदी पंचाइतामधे मनास आणिता, रास्ती इनसाफे पहाता, रामाजीचे वडील कुलकर्णी रुजू होत नाही, सरकारतर्फाने निसिदे पेसजी दरबीयाचे कामकाज चालवीत होते, यामुळे कुलकर्णासी दावा करू लागला, त्यास पंचाइतीचे मते व सनदापत्राशाहिदी मनास आणिता, कुलकर्णासी व रामाजीची निसबत नाही, कसबेमजकूरचे कुलकर्ण निलाजीचे वडीलपासोन निलाजीचे ऐसे खरे जाले, रामाजीसी व कसबियाचे कुलकर्णासी निसबत नाही याउपरि निलाजीस पंचाइतानी सांगितले की, तुह्मी आपलया सनदा व साक्षे आणून रुजू करणे त्यावरून निलाजी देसपांडिये यानी जाहीर केले की, पूर्वी रामाजीचे वडिल जनाजी एसप्रभु व गणेश प्रयाग यानी शहामतव बसालत मर्तबतखानवालाशान नवाब मातबरखान याजवळ कुलकर्णासाठी फिर्याद जाले होते, ते समयीचे साक्षीपैकी हजीरमज्यालस तुकोजी लंकटराव अदकारी ता। वाजे व गोविंदना। बुरकुले बजान का। मा। यास बोलावून हकीकत मनास आणणे त्यावरून, त्यास बोलावून पंचाइतानी पुरसीस केली त्यावरून -

तुकोजी लंकटराव यानी व गोदवाना। बुरकुले यानी हकीकत सांगितली की, जनाजी एसप्रभु व गणेश प्रयाग याही नबाब मातबरखान याजवळ नवाब फिर्याद केली होती, तेव्हा जमीदार व रयत हालीमवाली मातबरपोख्ते जमा करून तहकीक केले, ते समयी जनाजी व गणेश प्रभु पूर्वी निसिदे होते, निलाजी देसपांडे याचे वडील कुलकर्णी का। मा। ऐसे खरे जाले त्याजवरून सनद वजारतपन्हा महमद बकर दीवान यानी गोविंद बलाल देसपांडे कसबियाचे कुलकर्णी खरे करून सनद दिधली रामाजीचे वडिल पूर्वी निसिदे दीवानतर्फाचे होते ऐसे खरे जाले, कुलकर्णासी निसबत नाही. त्याजवर वंजारतपन्हाची सनद पंचाइतीमधे आणविली त्याची नकल बजिन्नस येणेप्रमाणे -