Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
सदरर्हू सनदा पंचाइतानी मनास आणिल्या त्यास, त्रिंबक नरसप्रभु औरंगाबादेस जाऊन खिलाफ मालुमात करून वजारतपन्हा बाजीसफीखान याची सनद धरमगदास दीवान यास घेऊन आला त्यास, धरमगदास दीवान यानी त्रिंबक नरस प्रभु यास सनद दिल्ही त्यात पटवारी अगर कुलकर्णी ऐसे नाही कदम चालत आले आहे तेन्हेप्रमाणे चालवणे, त्यास नविसीदगिरी व हुदेदारी सरकारातून मुशारा घेऊन दीवान तर्फेने चाकरी करावी, ऐसे होते ते पचाइताच्या मते तहकीक जाले की त्रिबक नरस प्रभु नविसीदे व हुदेदार सरकारतर्फेचा नवकर होता, कुलकर्णासी तालूक नाही दीवानतर्फेचा चाकर अजीसबब त्यास ताकीद की दामदीरम सरकारचा तफावत न करणे जमीदार असता, तर ऐसी सनद हासील न होती ऐसा पंचाइताचे मते निवाडा जाला
राजपत्रे २ दोन बित्तपसील
(१)
(१५९० माघ शु॥ ४)
मसरुल अनाम राजश्री नारो भिकाजी सुभेदार व कारकून सरदेसमुखी सरकार महालहाय तलकोकन प्रती राजश्री शिवाजी राजे सु॥ तिसा सितैन अलफ त्रिंबकजी नरस प्रभु हुजूर येऊन मालूम केले की, कसबे कल्याणजे कुलकर्ण व हुदेदारी आपली मिरास सालाबाद माहात कदम कारकीर्दी मलिकबर बाजे कारकीर्दी दर कारकीर्दी चालत आले असे, हाली मोगलाचे कमाविसीमधे देसमुख व देसपाडियानी कुसूर करून चालो देत नाहीं चिटणीस व नाईकवाडी यांचा मुशारा सरकारी पोते खर्च पडत होता तो हाली मिरासदारानी रयतेनिसबत लावून त्याचे चालवितात, आणि आपणास हुदेदारीचा मुशारा दरमाहे टके १० व कागदबाब दरमाहे टका १ एकून टके ११ होते हे चालवीत नाही, तर आपला हि मुशारा सदरर्हू रयतेनिसबतीने लावून चालवीत व कुलकर्ण हि बिलाकुसूर चालवीत ऐसे केले पाहिजे ह्मणून मालूम केले, तर बाजे मिरासदाराच्या मिरासीच्या मिरासी चालवावया आणि यासी कुसूर करावया काय गरज आहे ? हाली तुह्मी देसमुखदेसपाडियासी ताकीद करून त्रिंबक प्रभु मजकूराचे कुलकर्ण व हुदेदारी सालाबादप्रमाणे हुदेदारीचा मुशारा बाजे मिरासप्रमाणें रयतेनि सबतीने देत ते करणे बोभाट येऊ न देणे छ २ रमजान