Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १९९                                                                                                                              १६५३ आश्विन वद्य १४                    

महजर बतरीक सुरत मजलस बहदूर श्रीमंत माहाराज कृष्णराव मा। महमुदजी अल्लीजी व इमाम बक्ष वा। मियाजी चोधरी, प्रांत कल्याणभिवंडी, सरकार तलकोकन, निजामनमुलकी सुभे खोजिस्तेबुनियाद, व विठोजी देसमुख प्रगणे मुरजन व आदीकारी ता। अंबरनाथ वगैरे व बाजे हाली व मवाली रयानी कसबे कल्याण, सुहुरसन इसने सलासीन मया अलफ, सन जलुसी १३, मुताबीक सन हिजरी सन हजार ११४४, बतारीख छ २७ माहे रबिलाखर निलाजी साबाजी व बालाजी तिमाजी बिरादर निलाजी मजकूर व गणेश सुंदर देसपांडे मामले मुरजन व कुलकर्णी कसबे कल्याण व पेठ नवेनगर याजवर रामाजी आत्माजी व नारो भगवान व नारो गणेश प्रभु गुप्ते साखीन कसबे कल्याण, हे राजश्री पंतस्वामी याजकडे जाऊन फिर्याद जाला की, कसबेमजकूरचे कुलकर्ण आपले आहे, दर्म्यान देसपांडे मजकूर आपणास दखल होऊ देत नाही, आपण वतन खातात तर साहेबी इनसाफ करून आपले वतन आपणास देविले पाहिजे याजवर, राजश्री पंतमशारनिले स्वामी याही निलाजी देसपांडे प्रगणे मजकूर यासी बोलाऊन कसबेमजकूरचे कुलकर्णाची हकीकत पुरसीस केली त्याजवर, देसपांडेमजकूर, याणी हकीकत जाहीर केली की, रामाजी मजकुरासी वतनासी तालूक नाही, साहेबी इनसाफ केला पाहिजे त्याजवर, हरदौजनाची हकीकत व सनदा मनास आनून हरदौजनाचे मुचलके व जामीनी घेऊन पंचाइतावर इनसाफ सोपिला त्यास संमत देऊन आज्ञा केली की, रास्ती इनसाफ करणे ऐसीयासी, पंचाइनाती हरदूजनास आज्ञा केली की, साक्षे व सनदा घेऊन येणे, त्यास, प्रथम अग्रवादी राजाजी आत्माजी व नारो गणेश व नारो भगवान यासि हकीकत पुसिली त्याही जाहीर केले की, आपण कसबे-कुलकर्णी, तरनिसीदे, तरहुदेदार, तरकारकीर्दी मलिकंबर ता। अमल माहाराज छत्रपति, आपले वडिलाही अमल केला आहे, आपल्या वडिलाखेरीज कसबेमजकूरचा अमल दुसरियाने केला नाही, अलीकडे मोगलाईपासोन वर्षे ४३४४ त्रेताळीस चवेताळीस पावेतो भोगवटा जाला नाहीं, पूर्वीच्या आपणाजवळ सनदा असनात आहेत, व आपले वडिलाचा भोगवटा हि आहे, त्याचे गोहीसाक्षे आहेत, रुजू करून देऊ, ह्मनून रामाजीमजकुरानी जाहीर केले याजवर, निलाजी देसपाडे यास बोलाऊन पुरसीस केली की, तुमचे वतनाची हकीकत करारवाके असेल ते जाहीर करणे त्यावरोन निलाजीमजकूर याही आपली हकीकत जाहीर केली की, कसबेकुलकर्ण कदीम आपले वतन आहे, वडिलवडिलापासोन आपला भोगवटा आजपर्यंत चालत आला आहे, कसबेमजकूरची रयत ताएफेदर आहे त्यास आणून तहकीक करावे, पूर्वी महाराज छत्रपति स्वामी याचे अमला अगोदर मोगलाई अमल होता तेव्हा कसबेमजकुरी मोहतर्फीयाचे दरीबे होते, त्याजवर इनामदार काजी व मुफती व खतीब व मुल्लाफकीर फुकरा वगैरे त्यास रोजबरोज देणे असे, त्यास ज्याचा हक्क त्यास पोहचला पाहिजे, याजकरिता रामाजी आत्माजी याचा वडील निसीब ठेविला, त्याणे सरकारातून मुशाहिरा घेऊन दरीबीयाचा वसूल कुलकर्णीयाचे मारुफातीने करून रोजदारास पोहचवावा,