Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

ही गोष्ट कसी घडेल ? अर्काट वगैरे प्रांतीं जो मुलूख सुटेल, त्यापैकीं निमे श्रीमंतांकडील मातबर जे समागमें असतील, त्यांचे हवालीं करूं. याप्रमाणें तहनाम्यांतील दोन तीन कलमांची झाडपछाडी करून सांगितलें जे, तहनामा व निभावणीचीं खतें आणिलीं आहेत, तीं ठीक नाहींत. येथून मसुदे करून देऊं त्याप्रमाणें तहनामा व सौगंधशफतेनिशीं श्रीमंतांकडील व मदारुलमहाम यांचें व पंडत आजम हरीपंडत व रावसिंदे व रावरास्ते व कृष्णाराव यांचीं पत्रें आणवावीं. हामेशा पत्राच्या थैल्या येतात त्यांजवर अगर लाखोट्यावर सिके होतात, त्याप्रमाणें सिके करूं नयेत. हीं निभावणीचीं पत्रें सबब पत्रांमागें सिरस्तेप्रों । सिके असावे. सांगितल्याबमोजीब तुह्मीं आपलीं खतें लेहून, मसुदे व थैल्या सांडणीस्वरासमागमें सिरस्तेप्रों। सिके असावे. याप्रमाणें लिहून पाठऊन तहनामा व सौगंधशफतेनिसीं पत्रें जलद आणवावीं. तेथून मसुदे बमोजीब तहनामा व पत्रें आह्मांस उलट न आल्यास त्यांची येख्त्यारी. तुह्मांस निरोप देऊं. याप्रों। साफ सांगितलें. ऐसियास, येथील प्रसंग पाहतां इंग्रेजावर जावयाची तरतूद जाली आहे. मसलत मोठी याकरितां नवाबसाहेब यांचे मर्जीप्रों। व पत्रांतील अर्थ मनास आणून, मसुदेप्रों। मसुदे तहनामा व पत्रें सिक्या सहीत येऊन पोहंचलीं ह्मणजे शार्वरीसंवत्सरचे पंधरा लक्ष देतात. प्रस्तुत नवाबसाहेब यांनीं सावकाराच्या बशर्ती हुंड्या करून पुणियांत भुकणजी कासीदास व राजश्री राघवेंद्र नाईक नखाते सावनूरकर यांचे गुमास्ते आहेत, त्यांजकडे परभारें रवानगी केली आहे. मा। निलेचे गुमास्ते सरकारांत श्रुत करतील. मसुदेप्रों। तहनामा व पत्रें येतांच नवाबसाहेब यांनीं सावकारी निशा केली आहे. आमची रवानगी लौकर च करतील. आह्मीं येतेसमईं सावकाराकडील ऐवज समागमें घेऊन देऊं. सरकारांत ऐवज द्यावयाचा सिरस्ता, पेशजी खंडणी जाली तेसमयीं, होन पुतळी व नगद दिल्हे आहेत. त्याचा निरख नवाबसाहेब यांनीं दप्तरांतून लेहून आणून याद दाखविली. तीच याद बजिनस पाहून तिची नकल पाठविली आहे त्यावरून ध्यानास येईल. इंग्रेजाचें वर्तमान खाशांनीं सांगितलें कीं, चेनापटणकर गोरदोर याजपासीं इकडील वकील आहेत. त्यांची पत्रें वरचेवर येतात कीं, आपला व श्रीमंताचा सलूक जालियाचें वर्तमान ऐकोन आंदेशांत पडले आहेत. गोरदोर याचे दिलांत पुण्यावर राजकारण करावयाचें. कित्येक मनसबे करावयास आपण च्यार कुशलवाले [कौंसिलवाले ?] समागमें घेऊन पट्टणास यावें, ऐसीं खतें येतात. परंतु श्रीमंतांचे स्नेहाकरितां त्यासीं बिघाड केला. हें वर्तमान, श्रीमंताकडील वकील चेनापटणीं आहेत, ते पुणियास लिहीत असतील. इंग्रेजाची मसलत भारी. तंबी व्हावयास दोन तीन वर्षें लागल्यास एकदीलपणें असावें. आह्मी इकडे इंग्रेजावर नमूद जालियावर, तिकडे राजकारण लाऊन, साष्टीं व जंबूसर वगैरे मकानें देऊन, दादासाहेब यांचाही मार्ग हरयेक बोलून, नगद रुपये द्यावयास कबूल होतील. तरी तर्फेन इतला व मसलतीसिवाय सलूख करूं नये. ह्मणोन आह्मांस पत्रीं ल्यावयास सांगितलें. नवाबसाहेब यांची मर्जी पाहातां श्रीमंतांचा स्नेह वृद्धी होऊन, इंग्रेजास तंबी उत्तम प्रकारें करावी. बेंगरूळ व आणखी एक दोन जागां तोफखाना अगोदर गेला आहे व आणखी सरंजाम रवाना होत आहे. बहुत काय लिहिणें लोभ केला पाहिजे. हे विनंति.