Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                                 लेखांक ४९.                                               
१७०१ पौष वद्य ११                                                श्री.                                                          १ फेब्रुआरी १७८०.                                                                                                              

सेवेसीं कृष्णराव नारायण जोसी सां। नमस्कार विनंति येथील कुशल त।। छ २४ मोहरमपावेतों मुकाम श्रीरंगपट्टण समस्त सुखरूप असों. विशेषः-हजरतनवाबसाहेबांची मुलाजमत जाहिलियाचें वर्तमान आलाहिदा पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. श्रीमंतांचा व हजरतांचा सलूख घडावयाविसीं कित्येक मजकूर सांगितले होते, व सरकारांतून तहनामा व आहादशर्तेची थैली व स्वामींकडील व राजश्री हरीपंततात्या व राजश्री माहादजीराव सिंदे व रावरास्ते व राजश्री कृष्णरावजी यांची निभावणीचीं पत्रें घेऊन दरबारास गेलों. प्रथम बोलणें जालें. नंतर तहनामा व पत्रें पाहावयास मागून घेऊन, मुनसीपासोन तहनामा व पत्रें तपसिलवार दर्याफ्त केलीं. तहनाम्यांत अदवानी तालुक्याचें कलम लिहिलें होतें. सबब बोलिले कीं, नवाब निजामअलीखांबहादूर यांची व श्रीमंतांची दोस्ती बहुत दिवसांपासोन आहे.- कां असेना. आमचें व त्यांचें सुदामत नाहीं. पेशजी त्यांनीं इंग्रेजाचे मसलतींत आपल्यासीं बेमानी केली. व अलीकडे जाबीतजंग धोशा यांनीं प्रांतांत येऊन, बहुताद खराबी करून, मातबर कुळें धरून नेलीं. तीं त्यांजकडेच आहेत. त्यांची व आपली निखालसता व्हावयाचा वख्त येईल तेव्हां सलूख होईल. दरम्यान त्यांचे तालुकातीचें कलम तहनाम्यांत ल्यावयाचें कारण काय ? याप्रमाणें बहुत बोलण्यांत पर्याय येत चालले आहेत. तेव्हां आह्मी व राजश्री गोविंदराव व गणपतराव व सिंदे यांजकडील ग्रहस्त व राजश्री नरसिंगराव सह समजून रदबदली केली जे, मदारुलमहाम यांचे दिलांत इंग्रेजाची मसलत भारी आहे; त्यांस तंबी बरे वजेनें व्हावी. याकरितां दक्ष्णेंत दौलती तीन. श्रीमंत व आपण व नवाब निजामअलीखांबहादूर. तीनही दौलती एक जाल्यानें उमदे मनसबे होऊन बहुताद नफे आहेत. इंग्रजांनीं चहूंकडे गडबड मांडली आहे. त्यांस तंबी चांगली होईल. ह्मणून कित्येक पर्याय बोलिलों. परंतु उत्तर केलें कीं, तूर्त हें कलम तहनामेंत ल्याहावयाचें नाहीं. नवाब निजामअलीखा यांचा व आमचा सलूख नसल्यास ते कांहीं इंग्रेजाकडे मिळणार नाहींत. कदाचित् राजकारण राखल्यास चिंता नाहीं. पाहून घेऊं. अदवानी तालुकेविसीं मदारुलमहाम व रावरास्ते व कृष्णराव यांचीं खतें आलीं, त्यावरून त्यांसीं सलूक जाहाला. याप्रमाणें आणखी कलमें होतीं. त्यांतील मुख्य कलम, सालमजकुरीं विकारीसंवत्सरच पंधरा लक्ष रुपये द्यावे. त्याचें उतर केलें कीं, आपण इंग्रेजावर मसलतसीर आहों. करोडों रुपयांची मोहीम मसलत. फौज भारी व बार व तोफखाना यांचा खर्च किती हे दौलतवंतासच ठाऊक. चैत्र मासीं दुसरें साल शार्वरीसंवत्सर जवळ आला. या सालास दोन महिने राहिले. हाली सालचे पंधरा व पेस्तर सालचे बारा एकूण सत्तावीस लक्ष एक सालांत कोठून द्यावे ? आणि मसलत भारी कसी सांभाळावी ! असो. तूर्त पंधरा लक्ष देऊं. परंतु तहनाम्यांत शार्वरीसंवत्सर लेहून आणवावा. ह्मणजे पेशजी खंडणी जाली ते समयीं नगद ऐवज दिल्हा त्याचा सिरस्ता आहे, त्याप्रमाणें भरणा करून देऊं. सालमजकूर विकारीसंवत्सराचे सालअखेरीस अवकाश थोडा राहिला; मसलतसीर आहों; याकरितां सालमजकुरचा ऐवज द्यावयाची सोय घडत नाहीं, असें साफ सांगितलें. मुलकाचें कलम लिहिलें होतें, त्याचें उतर केलें जे, आपण घेतलेला मुलुख तश्रुफांत आहे. त्याचे मोबदला आह्मी अर्काट वगैरे प्रांत महमदअलीखां व इंग्रेज वगैरे यांस तंबी करून मुलूक घ्यावा. त्यापै॥ निमे मुलुक श्रीमंतास द्यावयाचा करार आहे. तो जिल्हा पट्टणास लगता सबब घेऊन, हाली तश्रुफांत आहे तो मुलूक श्रीमंतांस लगता सबब द्यावा.