Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३५. १७०१ पौष शु।। १४.
श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव नारायण जोसी सां।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. संतोष जाहाला. लिखितार्थ कळों आला. अदवानीचे मजकुराविसीं वे कामकाजाचा गुंता उरकून सत्वर यावयाचें करावें ह्मणोन विस्तारेंकरून लिहिलें. ऐसि - यास, इकडील वर्तमान तरी, हरीहरचे मुकामाहून पत्रें पा।। होतीं. त्या अलीकडे दरमजल येऊन छ १० मोहरमीं श्रीरंगपटणास पोंहोचलों. नवाबसाहेबांनीं राजश्री श्रीनिवासराव वारकी यांस दोन कोस सामोरे पा। होतें. मातबर मनुश. यांनीं समागमें येऊन अगोदरच स्थल किल्ल्यानजीक कावेरीतीरीं नेमिलें होतें. त्या जाग्यावर आणून उतरीवलें. छ १२ मीनहूस वलाऊ पा।, त्यावरून रात्रौ चार घटका रात्रीस गेलों. नवाबसाहेब यांची भेट जाहाली. सर्वांचें कुशलतेचें वृत्त पुसिलें. उतर समर्पक व्हावयाचें तें जाहालें. नंतर च्यार घटका राहून बोलिले कीं, कितेक बोलावयाचें आहे. त्यास एक दोन रोजा सूचना होईल.