Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                               लेखांक ३८.                                               
१७०१ पौष शु॥ १४                                                श्री.                                                          २० जानुआरी १७८०.
                                                                            

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सा। नमस्कार विनंति उपरी येथील जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मांस जाऊन फार दिवस जाले. जातांच नवाबबहादूर यांसीं बोलोन, अदवानीचा उपद्रव मना करवावा. ऐसें असतां अदियाप कांहींच घडून येत नाहीं. रोजबरोज उपसर्ग अधिकच होतो. मुदगल तालुकियांतही नवा हांगामा शुरू जाला आहे. यावरून परम आश्चर्य वाटलें कीं, बोलणें व करार काय ? आणि घडतें काय ? मोठे मसलतीवर नजर देऊन, नवाबबहादुर यांचे ह्मटल्याप्र॥ करारमदार केले. इंग्रजाचे तंबीचे मसलतींत नफे फार. तें कांहीं न होतां, व कडपे तालुकियास इंग्रजाचा तालुका लगता, तिकडे हांगामा व्हावा तें राहून, आपआपणांत कजिये करीत बसणें हें काय ? इंग्रजाची मसलत मोठी, दिवस सर्व निघोन गेले. इतक्या दिवसांत चेनापट्टण प्रांतीं जाऊन टोपीकरास ताण दिल्हा असावा, तें कांहींच नाहीं. इकडील सर्व तयारी जाली. सिंदे होळकर फौजसह गुजराथ प्रांतीं जावयास निघाले. सुरतेस वकील होते ते माघारे बोलाऊन घेतले. भोंसले यांचाही पंचवीस तीस हजार जमाव होऊन, बंगाले प्रांतीं त्यांणीं कूच केलें. राहतां नवाब निजाम आलीखां व नबावबहादूर राहिले. नवाबांची सर्व तयारी जाली. अदवानीकरितां तटून राहिले आहेत. नवाबांचा व सरकारचा स्नेह. ते आपले जागीं नाखुष. तेव्हां मोठे मसलतीस पायबंद बसतो. बाहेरील मसलत राहून, अदवानीसाठीं कजिया पडणें ठीक नाहीं. नवाबबहादूर दूरंदेश. सर्व पल्ले त्यांचे ध्यानांत आहेत. त्यांचे लिहिल्यावर व कायममिजाजीवर नजर ठेऊन मसलत केली, ते सेवटास जावी. दिवस कांहीं बाकी राहिले नाहींत. आह्मी नवाबाची खातरजमा करून नित्य लिहितों कीं, अदवानीचा हांगामा लौकरच दूर होईल. आपण जलदी न करावी, ऐसें लिहितों. परंतु, तिकडून हांगामा दूर होत नाहीं. उलटा, मुदगल तालुकियांत नवीन उपद्रव जाला. त्याजवरून नवाबाचीं पत्रें आलीं कीं, तुह्मीं खातरजमा करून लिहितां, आणि कांहींच प्रतियास येत नाहीं, हें काय ? ऐसीं आलीं. त्यावरून हें पत्र लिहिलें असे. तरी, तुह्मीं व राजश्री नरसिंगराव नवाबबहादूर यांसीं बोलून, अदवानी व मुदगल तालुकियाचा उपसर्ग दूर होऊन, चेनापट्टणाकडे नमूद होत ऐसें करावें. उग्याच जिकडील तिकडे मसलती तटून राहिल्या ! दिवस हेच मुख्य आहेत. तेथील कच्चा खुलासा समजावा.

सारांष, अदवानीचा उपद्रव मना होऊन, तेथील सरंजाम आहे तो, तसाच कडपे तालुकियास लगता इंग्रजाचा तालुका आहे, तिकडे नमूद व्हावा. नवाबबहादूर यांणीं चेनापट्टणाकडे जावें. पत्रांची उत्तरें सत्वर पाठवणें. येविषयीं* बहुत पत्रें गेलीं. परंतु अमलांत दिसत नाहीं. हें मोठे मसलतीस व करारमदार जाले त्यास एक प्रकार दिसतें. याकरितां, तुह्मीं नवाबबहादरांशीं बोलून महसरा लौकर उठे व चेनापट्टणाकडे जाणें लौकर होय, तें करावें. र॥ छ १२ मोहरम बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.

पै॥ छ २७ मोहरम, सन समानीन, मु॥ श्रीरंगपट्टण.