Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३०.
१७०१ मार्गशीर्ष वद्य ११ श्री. २ जानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :--
विनंति उपरी, राजश्री चंदरराव पोंवार, श्रीमंत राजश्री दादासाहेबांपासोन निघोन, दोन च्यार हाजार जमाव करून, आमदाबाद तालुकियांत हांगामा शुरू केला होता. त्यारा, आमदाबादकर यांजकडील जमाव व राजश्री फत्तेसिंगराव गाइकवाड यांची फौज जाऊन पोंवारास तंबी करून, सर्व त्याचा जमाव लुटून घेतला. याप्रों। जालें. राजश्री विसाजी आपाजी व भगीरथराव सिंदे व पाराजीपंत ऐसे माघून दाहाबारा हजार फौजनसीं गेले. सरदारांचाही जाण्यास याउपरीं गुंता नाहीं. किरकोळी सर्व वर्तमान पेशजी सांडणीस्वाराबराबर लिहिलें आहे, त्यावरून कळेल. नवाबबहादर यांस पत्र लिहिलें, त्याचा मसविदा पाठविला, त्यावरून सर्व कळेल. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबांसीं बोलावें. अदवानीचा उपद्रव मना व्हावा. चेनापट्टणाकडे सत्वर जावें. करार बमोजीब निभावणींत यावें. तिकडील वर्तमान नवल विशेष इंग्रज वगैरे बहादरांस पुसोन लिहीत जावें हे विनंति.