Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २७ मोहरम, सन समानीन. लेखांक ३६. १७०१ पौष शु।। १४.
शुक्रवार. मु।। श्रीरगंपट्टण. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- तुह्मांस जाऊन फार दिवस जाले. अदियाप पट्टणास पावलियाचें उत्तर येत नाहीं. अदवानीचा हांगामा मना होत नाहीं. दिवसेंदिवस अधिक तसदी होती. दुसरें मुदगल तालुकियास नवा उपसर्ग लागला, यामुळें नवाब यांचा असंतोष, सरंजामी सर्व जाली असतां या शहाकरितां अडकून राहिले आहेत. नवाबांचा व सरकारचा स्नेह. त्यांचा असंतोष यांत पेंच फार आहेत. शत्रूचीं पारपत्याचीं कामें व ज्यांत नफे तें राहून, आपस आपसांत असंतोषी येणें ठीक नाहीं. दिवस निघोन गेले. इकडील गुंता किमपि नाहीं. सरदार गुजराथप्रांतीं जाण्यास डेरेदाखल जाले. फौजा पुढें गेल्याच आहेत. भोंसले यांणींही बंगल्याकडे कुच केलें. नवाब अदवानीकरितां राहिले. महसरा सत्वर उठला तर उत्तम. नाहींतरी मोठी मसलत राहून, हेच कजिये पडतील. येविशीं तुह्मीं व राजश्री नरसिंगराव, नवाबबहादर यांसीं बोलून, करारप्र॥ हांगामा मना होऊन चेनापट्टणाकडे जाणें नवाब बहादर यांचें व्हावें. सर्व निभावणी करून तुह्मीं सत्वर यावें. कांहींच समजत नाहीं. यास्तव कच्चें वर्तमान सत्वर कळवावें. इकडील कितेक मजकूर राजश्री नाना यांणीं त। लिहिले त्यावरून कळेल. आणि त्याअन्वयें बोलून लौकर अमलांत यावें.*र॥ छ १२ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.