Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २४ रजब सन लेखांक १६५. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जावें. विशेष. सिंदे यांकडील निभावणीचें पत्र विस्मृतीनें ठिकाणींच राहिलें. ते परवां रात्रीं आलें. हें वर्तमान नवाबबहादर यांस व आपणांस कळावें ह्मणून रा. गणपतराव केशव यांस पत्रें लि॥ अंचीवरून काल रवाना केलीं आहेत. तीं पावून वर्तमान कळेल. हालीं तें पत्र व नवाबबहादुर यांसी थैली व आपणांस सर्वांस पत्रें राजश्री नानांनीं सरकारचे हुजरे व कासदजोडी याजबरोबर सविस्तर रवाना केलीं आहेत. पोहंचून इकडील सर्वार्थ कळों येईल. निरंतर पत्रीं संतोषवीत जावें. रवाना छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा हे विनंति.