Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २१ रजब सन इहिदे लेखांक १६३. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
समानीन आषाढ मास. पत्रें पुरवण्या ५. श्री. २७ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो॥ बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मी छ ४ माहे जमादिलाखरचीं पटणचे मुकामचीं पत्रें पाठविलीं ते पावलीं. राव सिंदे यांजकडील निभावणीचें पत्रसहीत सांडणीस्वार जोडी आली. हें वर्तमान अगाव कळतांच नवाबबहादूर यांणीं आमचे रवानगीची तर्तुद करविली. राव सिंदे यांचें पत्र घेऊन येणें. तीं पाहून सर्व मंडळीस रुकसत देऊन आह्मी गुरुवारीं रात्रौ कूच करून बेंगरुळास जात असों, ऐसें सांगून पाठविलें. आह्मीं थैलीपत्र घेऊन दरबारास गेलों. थैलीपत्र फोडून पाहिलें, तों निभावणीचें पत्र आंत नाहीं; यांचे पत्राचा जाब मात्र होता. त्यावरून विस्मय जाला. गफलतीनें पत्र राहिलें ऐसें ठरलें. आह्मीं उत्तर केलें कीं, आपण मसलतीस खातरजमेनें चलावें, आह्मी बराबर येतों. निभावणीचें पत्र आलियानंतर आह्मीं रुकसत घेऊं. तेव्हां उतम आहे ह्मणोन बोलिले. त्यास, आपण राजश्री नारो सिवदेव यांची किंवा आणखीं कोणाची पाटीलबावांकडे रवानगी करून निभावणीचें पत्र सत्वर येऊन पावें ऐसें करावें. या उपरी इंग्रजांवर जाऊन त्यांस सजा करण्यास नवाबसाहेबाकडील गुंता नाहीं ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसियास, निभावणीपत्र थैलींत नव्हतें, हे गोष्ट ठीक न पडली. यास्तव तुमचीं पत्रें पावतांच पुढें शुतरस्वार जोडी सिंदे यांजकडे पाठवावी. मागाहून नारो सिवदेव यांचीही रवानगी करावी. ऐसा निश्चय केला. तों इतकियांत सिंदे यांजकडून छ २५ माहे जमादिलावलचें निभावणीपत्र मसुद्याप्रमाणें येऊन पोहचलें. आह्मीं लिहिण्याचे पूर्वीं त्यांणींच समजोन पत्र रवाना केलें. हालीं तें निभावणीपत्र आह्मी व राव रास्ते व राजश्री आनंदराव नरसी[ग] यांणीं वाचून पाहून तुह्मांकडे रवाना केलें आहे, तें नवाबबहादूर यांस द्यावें. आह्मी व सिंदे कांहीं दोन नाहीं. सरकारचा कारभार, त्यांचें आमचें करणें एक, इकडून निभावणीपत्रें सौगंध शपथेनसीं पाठविलीं, तेव्हां याप्रमाणें सिंदे यांचे पत्र येईलच व गुंता पडणार नाहीं, ऐसें समजोन माघेंच नवाबबहादूर यांणीं कूच करून जावयाचें होतें, त्यांत फार कामें होतीं. त्यास, सिंदे यांचे पत्राविशीं गुंता जाला. इकडून जे गोष्टी करारांत व बोलण्यांत आली त्यांत बालाग्र कमी यावयाची नाहीं, येविशीं नवाबबहादूर यांची खातरजमा असावी. आमची दोस्ती कसी आहे हें सर्व आईंदे जहुरांत येईल. आतां तपसील लिहिणें दरकार नाहीं. राव सिंदे यांचे निभावणीचें पत्र येण्यास एक वाटेच्या खलशानें दिवसगत लागली. हालीं रवाना केलें, पावेल. इकडे या उपरी कोणेविशीं गुंता व जाबसाल राहिला नाहीं. नवाबबहादूर यांणीं दरकूच जाऊन इंग्रजास सिक्ष्या करावी. तुह्मीं सर्व कामें उगवून मंडळीसहीत सत्वर यावें. येथील प्रकार राव सिंदे व आह्मी दोन नाहीं. वाटेचे वगैरे खलषामुळें चार दिवस लागले. मागेंच जाणे जालें असतें तर फार काम होतें; व पत्रही येऊन पोंहचतें जहालें ते गुदस्त. याउपर लौकर जाणें व्हावें आणि तुह्मीं मंडळीसुधां सर्व कामें उलगडून घेऊन यावें. आपलेकडील तहनामा व निभावणीपत्रें सर्व तुह्मांजवळ आहेत. त्यास अगोदर नवाबबहादूर यांचा तहनामा सरकारचे तहनाम्याबमोजीब व नानकुराण व इकडील खातरजमेचीं निभावणीचीं पत्रें, ज्याचीं आहेत त्याप्रों। नवाबबहादरांचीं पत्रें त्यांस. याप्रों। आपणां जवळ घेऊन मग आपलीं पत्रें व तहनामा द्यावा. पूर्वींही येविशीं लिहिलेंच होतें. र॥ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.