Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २३ रजब सन लेखांक १६४. १७०२ ज्येष्ठ व॥ १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाब आमीरुलउमराव यांणीं कराराप्रमाणें सावकारी निशा करून दिल्ही; तेव्हां बशर्तीप्रमाणें त्यांचा तालुका ठाणीं जातसुधां त्यांचे हवालीं करावा. सोडचिठ्या नवाबबहादूर याणीं दिल्ह्या. अदयनी हावेलीचीं ठाणीं सुटलीं. शाहाडोंगर व कपटराळ वगैरे दोन चार ठाणीं व तालुका सुटणें त्यास, तो तालुका जमेदाराकडे आहे. तुह्मीं घेणें, ऐसें नवाबबहादूर ह्मणतात. जमेदारावर सख्ती करावी तरी बलहरीकर व गुतीकर कुमक करितात. ऐसे नानाप्रकारें नवाब निजामअलीखांबहादूर यांजकडून बोभाट येतात. त्यास, तालुका घेतला ते समयीं नवाबआमीरुलउमराव यांजपासोन घेतला, हालीं जमेदार दाखवणें हें काय ? येविशीं तुह्मीं नवाबबहादूर यांसी बोलून राहिलीं ठाणीं त्यांचीं सत्वर सुटेत तो अर्थ करावा ह्मणजे नवाब निजामअली यांचें इकडे लिहिणें राहील. त्यांस इतकेंच निमित्य आहे. यास्तव करारप्रमाणें ठाणीं जात सुटावीं. र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.