Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ९.

श्री.
१५६४ ज्येष्ठ वद्य ६

''महजर बतेरीख छ २० माहे रबिलोवल बहजूर हाजीर मजालसी मुकास क॥ खेडबारें

काजी अबदुला बिन काजी महमूद
हाकीमशरा व काजी सदर बिन काजी
इस्माईल काजी नेब प॥ पुणे
बापूजी मुद्गल हवालदार
प॥ पुणें
मालोजी नरसिंगरा
व विठोजी सितोले
देशमुख प॥ पुणें
कमाजी मोकदम मौजे
अतीत प॥ पुणें
मसुरल हजरती राजश्री दादाजी कोंडदेऊ
सुभेदार नामजाद किले कोंडाणा व
 माहालानिहाय
सुंदर हरी मजमूदार
प॥ पुणें
चाहू पाटिल मोकदम
मौजे चिकिली
लाखोजी व कभाजी
मोकदम मौजे मिर्जे

सु॥ सलास अरबैन अलफ कारणें महजर केला ऐसा जे. मिरासी बिन मियाजी व अमन बिन चांद मोकदम मौजे कातरज प॥ पुणें हे हरदोजण मौजेमजकुरीचे मोकदमीबदल आपणामध्यें आपण भांडत हुजूर आलेयावरी, साहेब व देसमुख व गोत बैसोनु हरदोजणाचे बोल मनास आणितां, मिराजी बिन मियाजी एणें तकरीर केली ऐसी जे, आपलें घर वडील नांव व नांगर व मानमाननूक आपले वडिलपणाच आपले वडील खात होते वरकड हक्क उत्पन्न निम्में आपले वडील खात असेती व निमें अमनाचे वडील, एणेप्रमाणें चालत होतें. यावरी आपले वडिलामधें व अमनाचे वडिलामधें मारे जाले. तधीपासुनु आपलें व अमनाचे सुरळीत चालत नाहीं. हे आपली तकरीर; सही. एणेप्रमाणें एणें तकरीर केली. यावरी अमनास पुसतां एणें तकरीर केले जे, मिराजीचे घर वडील होए. यावरी मिराजीचे वडील हिसेबी आपल्या वडिलासी वर्तती च ना ह्मणौउनु मिराजीच्या वडिलांत व आपले वडिलांत मारे जाले. तधीपासुनु आपलें व मिराजीचें सुरळीत चालत नाहीं. हे आपली तकरीर; सही. एणेप्रमाणें हरदोजणीं तकरीरा केल्या. यावरी अमनपाटिल बोलिला जे, मिराजीचें घर वडील आहे. मिराजीस नांगर देणें व कागदीपत्रीं आधीं नांव मिराचें व हरएक मानमाननूक व पानें व लुगडीं व वाजंतर व उवालणी टिला व बाजे मान जे मोकदमीचे निसबतीचे असतील ते तमाम आधीं मिराजीस देणें. त्यामागून आपलें नांव व टिलाविडा व पानें व लुगडीं व बाजे जे पान असतील ते तमामी आपणास घेईन व मोकदमीचे निमाचे मौजे मजकुरीं जे काळी व पांढरीस हक उत्पन्न होईल तें दो ठाई बराबरी वाटुनु मिराजी व आपण खाउनु. ऐसे बोलौनु आपले पूर्वजाची भाग ठेविली. यावरी सभानाइकी हरदोजणाचा एणेप्रमाणें निवाडा केला. बित॥

मिराजी बिन मियाजी याचें नांव
कागदीपत्रीं मोकदमीचे आधीं लिहीत
जाणें व नांगर एकच याणें करावा व
दिवाणांतील लुगडीं व पानें व टिला विडा
व वाजंत्र व उवालणी व दिवालीचे व
हरएक उवालणें व हरएक मानमाननूक
आधीं यासी व होलीची पोली आधी
एणें बांधावी व कालीस व पांढरीस जो
हक एईल तो निमे एणें खावा व माहारहि
यासि निमे असे.
अमन बिन चांद याचें नांव कागदीपत्रीं
मोकदमीचे मिराजी मागें लिहीत जाणें
व लुगडीं व पानें दिवाणांतील व हरएक
 ठाईची व वाजंत्र व उवालणी व दिवाळीचें
उवालणें व हरएक मानमाननूक हे मिराजीनें
आधीं घेणें त्यामागून याणें घेणें व होळीस
पोळी मिराजी आधी बांधेल त्यामागून
एणे बांधावी. काळीस व पांढरीस जो
हक एईल तो व माहार ऐसे निमे एणें
 खावे.

एणेप्रमाणें निवाडा केला आहे. एणेप्रमाणें आपलाले लेकुराचे लेकुरीं खाउनु सुखें असणें. यास जो हिलाहरकत करुनु सदरहू निवडिलेप्रमाणें जो वर्ते ना त्याणें दिवाणांत सिसे पांच व होनु पांचसे देणें.      हा महजर सही ''