Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ८.

(नकल)

श्री.
१५६४ ज्येष्ट शुध्द ११.
''महजरनामा बतारीख ९ माहे रबिलावू बहजूर हाजीर मज्यालस

काजी अबदुला बिन काजी
महमद हाकीमशरा व काजी
सदर बिन काजी ईस्माईल
नेम काजी प्रगणें पुणें
मसुरुल हजरती राजश्री
दादाजी कोंडदेऊ सुभेदार
व नामजाद किले कोंढाणा
व माहालनिहाय
बापूजी मुद्गल हवालदार
प्रा। पुणें
मालोजी नरसिंगराऊ व
विठोजी सितोळे देशमुख
प्रा। पुणें
सुंदर हरी मजमूदार
प्रा। पुणा
रामाजी सितोळे मोकदम
मौजे कुरकुंब
मोकदम मौजे वढाणें बाबाजी मोकदम
मौजे वडवड
मोकदम मौजे राजेगाऊ  

सु॥ सलास अर्बैन अलफ कारणें महजर केला ऐसा जे :- बाजी बिन बानजी व कृष्णाजी बिन सिदोजी रणनोवरे हे दोघे जण मौजे मलेद प्रा। पुणा येथील मोकदमी बदल आपणामधें आपण भांडत होते. या निवाडियाबदल बाजी बिन बानजी व कृष्णाजी बिन सिदोजीची माय पुताई हे हुजूर आलियावरी साहेब व देशमुख व सदरहू हाजीर मजालसी बैसोन दोघाजणांचे बोल मनास आणितां एणेप्रमाणे तकरिरा केलिया. बित॥

तकरीरकर्दे बे॥ बाजी बिन बानजी रणनोवरे तकरीर ऐसी जे, सिदोजी बिन बाकोजी हा आपल्या बापाचा वडील भाऊ तो आपला चुलता, सिदोजीचा धाकटा भाऊ बानजी तो आपला बा, हे दोघेजण भाऊ एकवट असतां सिदोजी आपला चुलता एणे आपला बाप बानजीस एणेप्रमाणें मोकदमीचें मान दिल्हे. कागदीपत्रीं नांव व नांगर दिवाणांतील हरएक ठाईचीं लुगडीं व पान व दिवाळीचें हरएक वाजंत्र व दिवाळीचें हरएक वोवालणें व होलीची पोली व वोवालणी व पोलीयाचे बैल व माहार व बाजे मान जितुके मोकदमीचे निसबतीनें असतील ते तमाम असकेच आपला बाप बानजीस सिदोजीने दिल्हे. याखेरीज काळीस पाढरीस मोकदमीचे निबबतीनें जे हक व उत्पन्न होईल तें दोघांनीं दो ठाई बराबरी वाटून खावें.