Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
निमें आपला बाप बानजी, निमें सिदोजी. एणेप्रमाणें खावें. एणेप्रमाणें दिल्हें. ए बाबेचे गोही वरधोजी अजहातीदार मोकदमीवरी ठेविला आहे तो व गांवांतील मोख्तसर लोक व बलुते साक्षी आहेती. त्यांचे माथा सुकृत घालून गोही पुसणें. ते आपले सत्य स्मरोनु जैसी गोही देतील तेणेप्रमाणें आपण वर्तोन. जरी वर्तो ना, तरी दिवाणचे गुन्हेगार व गोताचे अन्याई; मोकदमीस समंधु नाहीं. एसाजी मेला, आतां बाजी आपणास ह्मणतो जे :- कृष्णाजी पालकपुत्र आहे त्यास वाटा होत नाहीं. आपणच खाईन. ऐसें ह्मणतो. तरी ए बाबें दिन्यानेस्वरीं जैसे असेल तेणेंप्रमाणें व समस्त सभानाईक थोरथोर जैसे सांगतील तेणेप्रमाणें आपण वर्तउनु. ए दोही बाबें तकरीर लेहून दिल्हिया आहेती. एणेप्रमाणें आपण वर्तोन जरी वर्ते ना तरी दिवाणीचे गुन्हेगारीण व गोताचे अन्याईण. हे आपली तकरीर सही. तकरीकर्दे बे।। पुताई सिदोजी बिन बाकोजी रणनोवरे. तकरीर केली ऐसीजे:- आपला दादला व आपला दीर बानजी हे दोघेजण असतां मोकदमीचे काम चालवावयास वरधोजीस ठेऊन मोकदमी दो ठाईं खात असेती. यावरी आपला दादला मेलियावरी आपले पोटीचा मूल एसाजी होता व आणीकहि कृष्णाजी पडतरा यांचे पांचा दिवसाचा मूल आपण घेऊन त्यास पुत्रपणें वाढविलें. तघीं आपले पोटीचा पुत्र यव पालक पुत्र असतां वरघोजीस अजहातीदास ठेऊन मोकदमी दों ठाईं करून खात असो. ए बाबेचे गोही वरधोजी अजहातीदार व गांवीचे लोक मोख्तसर व बलुते साक्ष आहेती. त्यांचे माथा सृकृत घालून गोही पुसणें. ते आपलें सत्य स्मरोनु जैसी गोही देतील तेणेप्रमाणे आपण वर्तोन. जरी वर्तो ना, तरी दिवाणचे गुन्हेगार व गोताचे अन्याई; मोकदमीस समंघु नाहीं. एसाजी मेला, आतां बाजी आपणास ह्मणतो जे: -कृष्णाजी पालकपुत्र आहे त्यास वाटा होत नाहीं. आपणच खाईन.एेसें ह्मणतो. तरी ए बाबें दिन्यानेस्वरी जैसे असेल तेणेंप्रमाणे व समस्त सभानाईक थोरथोर जैसे सांगतील तेणप्रमाणें आपण वर्तउनु. ए दोही बाबें तकरीर लेहून दिल्हिया आहेती. एणेप्रमाणे आपण वर्तेान जरी वर्ते ना तरी दिवाणीचे गुन्हेगारीण व गोताचे अन्याईण. हे आपली तकरीर सही.
एणेप्रमाणें हरदोजणी तकरीरा केलिया. यावरी गोही करणें. मोकदमीचा अजहातीदार मोकदमीवरी ठेविला आहे तो व गांवांतील मोख्तसर लोक व बलुते यांची नांवें बित॥
वरधोजी अजहाती मोकदमी मौजे मजकूर |
मोख्तसर लोक चांगोजी चोरघडा नागोजी दोरगा सोमाजी दोरगा |
बलुते | सोनजी जेधा |
नानावा जोसी व कुलकर्णी | |
लखमा चांभार | |
महार मांया |