Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

धाऊ प॥ बिन वाल                   बाबाजी बिन रामजी
पा। खैरा क॥ सुपे                    भाबकर मौजे वढाणें

दोघाचे हात एकवट बांधोन दिव करावया उभे राहिले यावरी गोत देशमूख महालानिहाय बित॥

आपाजि नायकर व श्रीपाजि                        साहाजी देशमुख
कुळकरणी अ॥ जाकोजी कोडे                      पा। चाकण
देशमुख ता। खेडबारे                                  गोंदजी व दतो नामाजी अजहती
लिलोजी अजहत देशमुख क॥ सासवड          आपाजी निगडे प॥ सिरवळ

एही अर्जदास्त केली जे आह्मी गोत आहो यां दोघास पुसोन तरी आपणात आपण समजले तर समजावून यावर सदरहू देशमुख दोघापासी जाऊन पुसिलेयावरी दोघे राजी होऊन आत्मसुखे भाका दिधलिया जे गोत हद घालील तेणेप्रमाणे दोही गावी वर्तणें ह्मणून गोवर जोंधले सिवोन भागा ठेविलिया देशमुख सदरहू एऊन हाजीर मजालसीस सांगितलेयारी मुनसुफिदारी दोघापासी कतबे मागितले गोत सिवेची हद घालील त्यासि जो तकरार करील त्याने दिवाणी होन ५००० व सिसे ५ देणे ह्मणून कतबे लेहोन दिधले यावरी हाजीर मजालसी तिवधियाकरता पश्चमे तिंवधा तेथे गेले तो मजरा चिचोली कसबे मजकुरीचा सुपियाखाले कमाविष आहे तेथील मिरासी निंब पाटील बिन माया पाटिल-बोरकर हाजीर मजालसीस होता त्यासि पुसिले त्यावरी इमान घातला ते असत्य वदसील तरी तुझिया पूर्वजाचे तोंडी मांगीमाहारीचे असुद तेणे आपले पूर्वज स्मरोन हद दाखविली पश्चमे दिसे ओहळाखालील काठी दक्षिणे चिचोळी सुपाचा मजरा उत्तरे वढाणें हे हद दाखविलियावरी मुनसुफिदार व गोत खातिरेस आणोन तेणे दाखविलीयापैकी वढाणाची जमीन. सुपेचिंचोळियांकडे टाकून अज बिघे ४ च्यार अलीकडे हद सिवेची घातली तिवधा वोहळास पूर्वे काठी वोहळा पैलाडि पश्चिमे दिशा वोहळा ऐलाडि दक्षणे चिचोळि सुपे उत्तरेदक्षणे हा तिवधा करून पुढे हद घातली पुढे पुणेदेशीचे सुपेदेशीचे मोकदम चालिले पुढे दगड थोडे घातले त्याप्रमाणे मुनसुफीदार व हाकीमशरा व देशमुख माहालानिहाय व देशक व देशमुख हरदो महाल या दो गावीचे मोकदम सिवेस बांध घालून दगडाचे खिळे केले बित॥

पश्चमे तिवधा तीन गाव

वोहळा करता पश्चमेस               वोहळा खालते पूर्व
कांठपासून पिसा                      काठापासून दक्षणे उत्तरे
                                            सुपे वढाणें

खिळा वोहळाचे कांठ नजीक मुरबी
या तिवधियापासून बिदाणे क॥ सुपे

दिवाचा खिळा थोर केला असे तेथवरी सदरहू अर्ज बिघे ४ च्यार टाकून वढाणाची जमीन पैकी सुपियाकडे टाकून तेथवर आले दिवाच्या खिळिायापासून तहद तिवधां डोंगराचे माथांपासून मार्ग बहुळगावास जातो तेथे केला सुपे वढाणे व पडवी या दोही तिवधियामध्ये बिदाणे बित॥

दिवाच्या खिळियापासून ईशाने पुढे तीटाऊन खालून नेम मुईन करून हद घालून तिवधियासि नेले तलई वढाणेचे यास उत्तरेपासून मार्ग वडवडास व देऊळगावास जातो तेथे डोंगरमाथां तिंवधा केला

पूर्वे सुपे पश्चमे वढाणे उत्तरे पडवी
सदरहू सिवेची हद घालून गडधो सिवेसि घातले बित॥
येणेप्रमाणे हद सिवेची घातली येणेप्रमाणे सालाबाद दोही गावी वर्तणे यासि जो पेस्तर हद मोडून कुसूर करील तेणे दिवाणी होन ५००० पांच हजार व सिसे ५ पाच देणे

हा महजर सही

हा करार कर्दे नाऊजी बिन बाबजी              बिदस्तूर माहादो लखमदेऊ
खैरा व धाऊजी बिन वाल प॥                    कुलकरणी
मोकदम क॥ सुपे