Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३४.
श्री.
१६२० माघ शुध्द १०.
'' ε मा। अनाम राजश्री कान्होजी जुंझाराऊ देशमुख व देशकुलकर्णी ता। कानदखोरे यांस :- नारो यादव आसिर्वाद सु॥ तिसा तिसैन अलफ संभाजी पवार याकडे मिरासपटीची सेरणी तुह्मी आठ रुपयाची घातली होती. तो ऐवज माची पदमावतीस यात्रेबदल दिल्हा होता. यानिमित्य किलाच्या कारकुनानीं वसुलास माणूस पाठविला होता. त्यास तुह्मी तो ऐवज उडविला, आणि माणूस माघार पाठविले. तरी आज दसरियांचा दिवस, श्रीची यात्री व्होवी, त्यास तुह्मी विक्षेप केला. ऐसा गैरमाकुल. याउपर देखत आज्ञापत्र सदाहू आठ रुपये तुह्मी खुद निसबती देणें. दिरंग न लावणें. या कामास लोक सुभानजी कवडे नामजाद माची पदमावती पा। आहेती. यास दविणें रुपये २ दोन रुपये रास खुद नि॥ आदा करणें. छ ८ रबिलावल.''
लेखांक ३५.
श्री.
१६२२ कार्तिक वद्य ३.
'' ε म॥ अनाम कानोजी जुंझारराऊ देशमुख त॥ कानदखोरें यास :- रामचंद्र नीळकंठ अमात्य सु॥ इहिदे मया अलफ. कोंकणांत हबसियानें बहुत वळवळ मांडिलियाकारणें त्यास बरा नतीजा पावावयाबदल राजश्री मलारराऊ यात सात हजार फौजेनसी आजी कुंभारली घाटे उतरोन चिपळुणास आले. त्यास सामील व्हावयाबदल आह्मी हशम घेऊन स्वार होऊन गेलों. अशास हें पत्र तुह्मास पावेल तें क्षणीं, आपला अवघा जमाव एक माणूस टाको न देतां, सारा जमाव घेऊन, बहुत सीताबीनें एऊन, आह्मास सामील होणें. एक घटिकेचा उजूर न करणें, आजिचे प्रसंगी जो मसलत चुकावील, तो मणजे गनीमादाखल असें समजोन, बहुत सीताबीने एणें, उजूर केलिया सारी मसलतेची बदनामी तुह्मावरी एईल. हें समजोन लिहिल्याप्रमाणें वर्तणूक करणें. छ १६ जमादिलाखर निदेश समक्ष.''