Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११.
१५४६ ज्येष्ट शुध्द १
''अज दिवाण ठाणें मामले राएर व बारा मावळें हवाले खान इभराईम खान हवालदार व कारकून मामले मजकूर ता॥ कान्होजी जुंझारराऊ देसमुख तपे कानदखोरे मामले मजकूर सु॥ अर्बा इसरीन अलफ. हुजरु मालूम केले जे, साहेबास ह॥ साहेबीं हवाला देऊन पाठविले; साहेब सलामत माहालास पैवस्ता जाले; साहेबीं आपणियासी मसलती बदल लोक फर्माविले; तरी आपली इसाहती व इनामती हकलाजिना विस्वा सालाबाद आपले दुमाला आहे. हाल सालीं तो तरी साहेबास माहाल अर्जानी जाला आहे. तरी साहेबांचे खुर्द खत होए. मालूम जाले. तरी तू हिकविहाल होउनु असणे. तुमची इनामती व इसाहती व विस्वा तुमचे दुमाला केला असे. सालाबाद जैसे चालिले असे, तेणेप्रमाणे इनामती व इसाहती व विस्वा हकलाजिमा दुमाला केला असे. मोर्तब सुद.''
तेरी २९ माहे रजबू
रजबू
लेखांक १२.
त॥
१५४७ माघ वद्य ४
''अज रख्तखाने खुदायवंद मलिक शर्के मलिक अंबर खूलिदयामदौलतहू बजानेब कारकुनानि मामले राईर व बारा मावळे बिदानद सु॥ सीत इशरैन अलफ. हेजीब जुंझार मरळ देसमुख त॥ कानदेखोरे मामले म॥ हुजूर मालूम केले जे, देशमुख मजकुरास इसाहती देह २ मौजे पाबे देह १ व मौजे धानेब देह १ व सेते २ इनामती त॥ सेत मौजे अत्रोळी उंबरपेढे १ सेते मौजे विंझर मोरटाके १ व विस्वा व हकलाजिमा सालाबाद कारकीर्द दरकारकीर्द भोगवटा चालतो. ब॥ खु॥ खाने अजम हैबतखान व वजिरानी भोगवटा चालतो. हाली देसमुख म॥ म॥ साबाजीपंताबराबरी जमते लोक से ३०० तीन चाकरी करितो. देसमुखमजकुराचा बाप कान्होजी जुंझारराऊ मसलतीमध्ये खर्चला. तरी साहेबों नजर एनायती फर्माउनु ताजे खुर्द खत होए. मालूम जाले. तरी देसमुख म॥ इसाहती देह २ मौजे पाबे देह १ व मौजे धानेब देह १ व इनामती सेते २ मौजे अत्रोळी सेत उंबरपेढे १ व मौजे विंझर सेत मोरटाकें १ व विस्वा व हकलाजिमा सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्द भोगवटा चालतो. ब॥ खु॥ खाने अजम हैबतखान व वजिरानि भोगवटा चालतो. हाली देसमुखमजकुराचा वालीद मसलतीस खर्चला आहे ह्मणौनु इसाहती व इनामती व विस्वा व हकलाजिमा ब॥ भोगवटा तसरुफाती चालेले असेल तेणेप्रमाणें चालविणें. तालीक घेउनु असल फिराउनु दिजे.''
तेरीख १७ माहे
जमादिलावेल