Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८
१५४० आश्विन शुध्द ७
''अज रख्तखाने राजश्री पंतगराऊ राजे दामदौलतहू बजानेबु कृष्णाजी गोविंद हवालदार व कारकून तपे कानदखोरें बिदानद सु॥ तिसा अशर अलफ कान्होजी जुंझारराऊ देसमुख ता। मा। अर्दांस पाठविली. तेथें लिहिलें कीं आपले इनामतीचे गांव दोनी व सेतें दोनी याबदल सीरणी टके सतरासें साहेबांस कबूल जालों आहे, त्याची उगवणी करितों. व सालमजकुरीं तपेचे इजारतीची बेरीज आहे. त्याचीहि उगवणी करितों. आणि कारकून आपले इनामतीचे गांव व गांवगना हकलाजिमा आहे तो तमाम कमावीस करून घेताती. बंदे कमीनास कांहीं देत नाहीत. तरी आपण काय खांवे ? आपला रोजगार कैसा चालेली ? आपणास खावया नाही. कारकून तमाम विलायती अमानत कमावीस करून घेताती. आपण रयतीचे कौलाबोलाचे कीर्दी व हरएक बाबें अर्ज करितों, तो मनास आणीत नाहीत. आपली अर्दास आइकत नाही. याचे विसीं आपण ह्मणतों त्यास अदीकच ताकीद करिताती. आपली कांही हुरमती राखता नाहीत. सालाची उगवती आठा महिनियामध्यें करा ह्मणौनु कुणबियासि ह्मणताती. ऐसा आपला हाल आहे. ह्मणौनु रंजीस होउनु बहुत तपसीलें लिहिलें. तरी कान्होजी जुंझारराऊ देसमुख ता। मा। एणें इनामतीबदल सीरणी टके सतरासें कबूल केली आहे. त्याचे उगवणीची बेगमी देखौनु याच्या इनामती याच्या दुमाला करणे; व सालमजकुरीं तपेमजकूर इजारती रकमेस इस्तावा आहे तेणेप्रमाणें उगवणीची बेगमी जालेयावरी गावगनाचा हकलाजिमा देसमुखाचे दुमालां करणें; व याची इजती हुरमती राखत जाणे. रयतीचे बाबे व हरएक बाब अर्ज करीत जाईल तो खातिरेस आणून माकुल हाल सरंजाम करीत जाणें. गैरमाकुल न करणे. यास व रयतीस लायनी सीवीगाली व हाणमार न करणे व तशवीस नेदणे. माकुल अमल असेली त्यास एक जरेयाची तर्हे नेदणे. गैरमाकुल वर्तत असेली बिलाहरकती करीत असेली व गुन्हेगार असेली, त्यास पाहिजे तैसी ताकीद करणे. रयतीस लायनी एक जरा तशवीस नेदणे. गैरमाकुल अमल हरगीस होव नेदणे. माकुलहाल अमल करीत जाणें. अवघे रकमेची उगवणी आठा महिनेयामध्ये करा ह्मणौनु ह्मणता, तरी हंगामीचे हंगामीं उगवणी करणें. व देसमुखमजकुरें अर्दास लिहिले कीं, कारकून सालगुदस्ताचे कागद पुसताती, तरी सालगुदस्तांचा इस्तावा बेरीज टके ९०००. आणि उगवणी बेरीज महसूल टके ९६६०६१०॥ ऐसी उगवणी जाली. तरी सालगुदस्ता नव हजार टके जमे आहेती. टके ६६० ६१०॥ जमा नाहीत. हा कैसा अमल आहे ते बखैर हुजूर लिहणे.''
तेरीख ५ सौवालु माहे सौवालु