Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९
१५४२ श्रावण शुध्द ९
'' ε विठ्ठल गणपती हवाले त॥ कानदखोरे मालूम दानद सु॥ इहिदे असरीन अलफ. त॥ मजकुरीचा देशमुख हुजूर एउनु मालूम केले जें, साहेबीं नजर अनायत करुनु आपला हकलाजिमा व इसाफती सालाबादप्रमाणे देविले पाहिजे ह्मणौनु. तरी त॥ मजकुरीच्या देसमुखाचा हकलाजिमा व इसाफति दुंमाला केले असे. ब॥ सालाबाद प्रमाणे देविजे.''
तेरीख ७ माहे रमजान.
लेखांक १०
१५४५ आश्विन वद्य ११
'' ε अज जानीब म॥ अंबर त॥ सिदी अबदुल वाहद हवालदार व साबाजी नारायण सबनिवीस किले कोंढाणा मालूम दानद सु॥ अर्बा इशरैन अलफ. अर्जदास्त छ ११ जिलकादीं र॥ छ २ जिल्हेज मजमून कान्होजी जुंझारराऊ देसमुख त॥ कानदखोरें मु॥ वजारतमाब पतंगराऊ राजे तो नफर साहेबाचा आहे. त्याचा हकलाजिमा राऊ अजमाचे कारकून तहसील करून नेताती ह्मणौनु बयानवार लिहिले. तरी ए बाबें हुजरून राऊ मस्यारुनइलेचे हेजिबास फर्माविले असे. मोर्तब सुद.
तेरीख २४ रुजू सुरु
जिल्हेज् निवीस
बार सुद सुरु सुद
पे॥ छ १३ माहे सफर पाठविली *** तिमाजी रायदेऊ नायकवाडी किले मजकूर.''