Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५९
श्री चैत्र शुध्द ७ गुरुवार शक १६३०
छ ६ मोहरम सन १११७ फसली ११२० हिजरी
राजश्री शाहूराजे सुहुरसन समान मया अलफ ११०८
१८ मार्च १७०८
साक्षपत्र मुकाम कसबा पाटगाऊ शके १९३० सर्वधारी सवछरे चैत्रशुध सप्तमी सुहुरसन समान मया अलफ छ ६ मोहरम हाजीर मजालसी
→साक्षपत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या विद्यमानें जाहाले साक्षपत्र ऐसे जे प्रा। मसूर देह सत्तावन गावीची देशमुखी माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख पा। मजकूर याची देशमुखी पुरातन पिडी तर पिडी पूर्वापार चालत आली आहे ऐसियासि माहाराज राजश्री छत्रपती स्वामी याचे आगमन या प्राते जाहाले त्यासि राजश्री स्वामी आळदेच्या तळावरी आले इकडून राजश्री जाधवराऊ सेनापती हे भेटीस गेले बराबरी यादव हि घेऊन गेले त्याउपरि जाधवराऊ राजश्री स भेटले ते समयी यादवानी जाधवरायासी मसलत दिल्ही की कर्हाडची देशमुखी आपली आहे आपण तुह्मास चौथी तकसीम देऊ तुह्मी राजश्री पासी सनद करून घेणे समय हा च आहे त्याउपरि जाधवरायानी रदबदली केली की कर्हाडची देसमुखी यादवास देणे यादवाची आहे मग राजश्री बोलिले की कर्हाडची देशमुखी आमची आहे यादव कोण होताती तेव्हा रदबदली तैसी च राहिली मागती दुसरे दिवसी यादवास भेटावयासि घेऊन गेले राजरी ची यादवाची भेट केली त्यासि राजश्री छत्रपतीनी पुसिले की हे कोण आहेत जाधवरायानी सागितले की कर्हाडचे देशमुख यादव आहेत त्यासि राजश्री बोलिले की कर्हाडची देशमुखी आपली आहे हे आपणास ठाऊके नाहीत व आपण ऐकिले हि नाहीत तरी यासि देशमुख न ह्मणने कोण्ही ह्मणी ह्मणतील त्यासि साहेब इतराज होतील इतके जाहालियावरी तो मजकूर तैसा च राहिला मग दुसर्या तळावरी जाधवरायानी रदबदली केली की कर्हाडची देशमुखीची सनद करून दिल्ही पाहिजे राजरी नी हि मान्य केले की आह्मी तुह्मास खुद्द सनद करून देऊ परतु यादवास देणार नाही मग जाधवरायानी उत्तर दिल्हे की आपण आहे तोवरी आपणास भोगवटा होईल मग आपणास कोण खाऊ देईल ह्मणोन उत्तर दिल्हे त्याउपरि रदबदली तैसी च राहिली मग तस्कर कुच होऊन एऊन शिरवळावरी राहिले तो हिदूराऊ घोरपडे हे चिकोडीकडून भेटीस जावयासि कसबे मसुरास आले त्याबराबरी माहादजी जगदळे देशमुख याचा पुत्र यशवतराऊ आला मग हिंदूरायानी राज्याचे दर्शन घेतले