Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

त्यासि सांगितले की बाळाजी विश्वनाथ मुतालिक पंत अमात्य व पंताजीपंत मुतालीक पंत सचिव यासि जाऊन सांगणे की जाधवरायाच्या देशमुखीच्या सनदा लिहिल्या आहेत त्या आपणास विचारल्याविरहित न देणे ह्मणौन सांगितले व यादव गोपाळ हस्तक गदाधर भट्ट गोसावी याचे त्यासी सांगितले की तुह्मी जाऊन भट्टगोसावी यासी सांगणे की तुह्मी सनदा सिक्के करावयासि आणाल तरी आपण सिक्के न करी सिक्के तैसे च ठेवणे ह्मणौन सांगू पाठविले परंतु त्यांनी गै केली इतके जाहालियावरी हे वर्तमान जाधवरायासि कळले मग जाधवराऊ खुद्द कचेरीस आले कचेरीहून रा। गदाधरभट्ट व नारसेणवी व राघो काकाजी राजश्रीकडे खलबतखानियात पाठविले की आजी प्रतिपदेचा मुहूर्त आहे सनदेवरी सिक्के करून देणे त्यासि राजश्री बोलिले की तुह्मी यादवाच्या नावे सनदा लिहिल्या आहेत तरी आपण सिक्के करीत नाही यादव पुरातन जाहाले तेव्हा आह्मी त्याचे मुतालीक की काय कर्‍हाडची देशमुखी आपली आहे मसूरची देशमुखी तर जगदळियाची आहे आणि तुह्मी अतिशय करिता तरी तुह्मी खुद्द आपल्या नावे सनदा करून घेणे त्यावरी सिक्के करून देतो या सनदेवरी सिक्के करून देत नाही तुह्मी च आपले मनी समजणे जे देणे ते न्यायेकरून द्यावे लागते आपली भाकरी आहे तुह्मी जैसी मागता तैसी जगदळियासि देवणे तरी तुह्मी जाऊन जाधवरायासि समजाऊन सांगणे आणि त्याची भीड आहे ऐसे न होय की रागावरी नव जात ऐसे तजविजीने सांगणे ह्मणौन सांंगितले मग नारसेणवी व राघो काकाजी यांनी जाऊन जाधवरायासि वर्तमान सांगितले त्यावरून जाधवराऊ रागे आण घेऊन बोलिले की आपले एवढे काम होत नाही तेव्हा आपण चाकरी करीत नाही ह्मणौन उठोन आपल्या डेर्‍यासि गेले त्याउपरि रुसून घरी बैसले कारभार अवघा तटला मग जाधवरायाच्या डेरियासि राजश्री गेले जाधवरायाची समजावीस केली घोडा १ दिल्हा मग जेवावयासि सांगून आले ते दिवसी काही मजकूर जाहाला नाही मग दुसरे दिवसी मागती सिक्के करावयासि सनदा आणिल्या त्यासी राजश्री बोलिले की इतका अतिशय काय आहे आणि कितेक सरदारांनी हि जाधवरायासी सांगितले ते हि ऐकिले नाही अड घातला की जरी सनदा करून द्याल तरी आपण चाकरी करीन ह्मणौन अड घातला त्यासि राजश्री बोलिले की आपणास सकट प्राप्‍त जाहाले आजी सनदा करून देत नाही तेव्हा हा मूरख जैसा गेला तैसे च हे निघोन जातील ह्मणजे अवघे काम दरकम होईल ऐसे जाणोन वेळावरी नजर देऊन जाधवरायाच्या भिडेने सनद करून जाधवरायासी दिल्ही हे काम अडून जाहाले काही पचायत अगर इनासाफ जाहाला नाही हे अवघे मतलबी आहे जैशा मोकाशाच्या सनदा करून उग्याच देताती तैसी च हे सनद करून दिल्ही पाचाईतमुळे इनसाफ होऊन खरेखोटे करून सनद दिल्ही नाही हे आपणास दखल आहे यादव काही फडी प्रसंगी कोठे आपणास आढळले नाहीत माहादजी जगदळे देसमुख पा। मसूर याची सत्तावन गावीची देशमुखी खरी आहे पूर्वी जगदळियासि व यादवास वाद जाहाला वादामुळे यादव खोटे जाहाले आहेत जगदळे देशमुख खरे आहेत हे आपणास ठावके आहे आणि माहादजी देशमुख याचा पुत्र यशवंतराऊ येऊन उभा राहिला आणि हा करीना सांगितला आणि ह्मणो लागला की एणेप्रमाणे करीना जाहाला आहे हा खरा असिला तरी तुह्मी समस्त मिळोन एक साक्षपत्र करून त्यावरी मोहरा करून देणे ह्मणौन करीना जाहीर केला त्यासि आह्मी समस्तानी मनास आणिता हा करीना खरा आहे मग समस्तानी आह्मीं साक्षपत्र करून त्यावरी मोहरा करून दिल्ह्या हे साक्षपत्र सही वळी सुमार २१२ दोनी से बारा मोर्तब सूद

(शिक्का फारसी)