Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

मग हिंदूरायानी यशवंतराऊ जगदळे देशमुख व नारो रुद्र देशपांडिये पा। मसूर याची हि भेटी केली ते समयी राजेयानी विचारिले की हे कोण आहेत हिंदूरायानी सांगितले की माहादजी जगदळे देशमुख पा। मसूर याचा पुत्र आहे व ते दुसरे देशपांडे आहेत ह्मणौन सांगितले त्यावरून बरे ह्मणौन निरोप दिल्हा इतके जाहालियावरी लस्कर कुच होऊन सातारियाखाले एऊन मोकाम जाहाले तेथे जाधवरायानी अर्ज केला की कर्‍हाडची देशमुखी यादवाची आहे यादवाच्या नावे सनद करून देणे जाधवरायाची भीड फार यासाठी राजश्री नी मान्य केले मग जाधवरायानी मसुदा करून आणिला त्यात मसूरपरगणियाचे बगाव सत्तावन कर्‍हाडाखाले भिडवले मग हे वर्तमान यशवंतराऊ यासि कळले त्याने कचेरीस येऊन दोही दिल्ही आणि राजश्री छत्रपती स्वामीस अर्ज केला की आपणापासी पूर्वील पत्रे इभराईम इदलशा व सुलतान महमूदशाहा व हुसैन अरखान याची आहेत व अलीकडे माहाराज राजश्री कैलासवासी राजाराम याची हि पत्रे आहेत व गोताची पत्रे आहेत मसूरपरगणियाची देशमुखी आपली अलाहिदी आहे इतके असता सेनापती गैरन्याये करून जोरावारीने कर्‍हाडाखाले गाव आपले बळे च लिहिताती ह्मणौन अर्ज केला त्यासि राजश्री बोलिले की जे खरे असेल ते च करून एकाचे वतन एकास आपल्याच्याने देवत नाही तू आपली खातीरजमा असो देणे जाधवरायानी सनदा लिहिल्या होत्या त्या तैशा च राहिल्या इतका मजकूर जाहालियावरी यशवंतराऊ देशमुख यानी छत्रपतीस विनति केली की लस्करच्या धामधुकीकरिता आपला परगणा खराब जाहाला आहे कौल सादर केलिया परगणा आबाद होईल मग राजश्री नी आज्ञा केली की आपलिया परगणियाची नजरपट्टी चुकवणे ह्मणौन आज्ञा केली आज्ञेवरून यशवंतराऊ जगदळे देशमुख व नारो रुद्र देशपांडिये पा। मजकूर यानी परगणियाची नजरपट्टी खडून सिरपाव व कौल नावनिसीवार घेतला त्यावरी जाधवरायानी मागती मजकूर करावा तरी सातारा हस्तगत जाहाला रागणियासी जायाची त्वरा जाहाली लस्कर कुच दर कुच करून कसबे पाटेगावावरी आले तेथे जाधवरायानी रा। गदाधरभट्ट यासि मजकूर केला की माहादजी देशमुखाच्या लेकाने आपल्या सनदास दोही दिल्ही हे कोण गोष्टी आहे भटगोसावी यानी मान्य केले की सवत्सरप्रतिपदेच्या दिवसी सनदेवरी शिक्के करून देऊ ह्मणौन मान्य केले मग प्रतिपदेचे दिवसी सनदेवरी शिक्के करावयासी आले ते वेळेस माहादजी जगदळे देशमुख पा। मजकूर याचा पुत्र यशवंतराऊ याने दोही दिल्ही व राजश्रीस अर्ज केला की आपला इनसाफ होत नाही आणि आपणापासी सनदा आहेत त्या हि कोण्ही मनास आणीत नाहीत आपले वतन मसूरपरगणषायाचे पूर्वापार चालत आले आहे आणि आता जाधवराऊ गैरन्याये जोरावारीने यादव पाठीसी घालून सनदा करून घेताती आपणास कोणाचा आसिरा नाही आपले वडील तो भोसल्याचे नवाजीस आणि भोसल्याचे घरी वडिलावडिलाच्या खस्ता जाहाल्या आहेत इतके असता जोरावरी आपलियावरी होती आपली बदी कोण्ही देत नाही त्यासि बोलिले की कर्‍हाडची देशमुखी आपली आहे यादवास देत नाही मसूरीची तर तुझी आहे हे हि आपल्याच्याने देवत नाही तू काही चिता न करणे ह्मणौन सांगितले आणि भागीरथ चोपदार बोलाविला