Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीनाथ स॥
लेखांक ३६३.
१७३२ चैत्रशुद्ध १५.
राजश्री जनार्दन बल्लाळ गोसावी यांसि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। दौलतराव शिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ र॥ त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून रुपये घेऊन केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोशी कुळकर्णी मौजे साकेगाव प॥ शेवगाव यांनी आपल्याले हिश्शाचे वतन गाहाण ठेऊन गाहणखत लिहून दिल्हें त्यांत करार कीं ऐवज मुदतीस न दिल्ह्यास वतन डुलेल तुह्मी अनभव करावा याप्रमाणें आपले कुलदैवतांचे शफतपूर्वक व कसबे तिसगांव पा।। मजकूर येथील कुलकर्णपण चिमणाजी सदाशिव व आत्माराम सदाशिव कुलकर्णी यांनी आपल्याले वतन गाहणखत साके- गांवकरां- प्रमाणे करार लिहून दिल्हे त्याजवरून मुदती भरून गेल्या यांजकरितां त्र्यंबकराव चिंतामण यांनी आपले तर्फेने वतनाचे वहिवाटीवर कारकून पाठविले असतां वतनाचे हकदस्तूर व वतन बाब मानपान त्यांस सोपून न देतां दंडेली करितात पत्र ह्मणोन विदित जालें त्यांजवरून हे पत्र तुह्मास लिहिले असें तरी तुह्मी हरदो गांवकरी यांसी बोलाऊन आणून त्र्यंबकराव चिंतामण यांजपासी खतेंपत्रें आहेत ती आणवून पांच मेळवून उभयतांचे लेखाची चौकसी करून वाजवी पत्र व करारा अन्वये वतनाची वहिवाट दोनी गांवची त्र्यंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत चालेतें करणें लेखपत्र असतां पडली करीत असल्यास निक्षून ताकीद करून वहिवाटीस दिक्कत न पडेतें करणें जाणिजे छ १४ रबिलाबल बहुत काय लिहिणे हे विनंती.