Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीनाथ स॥
लेखांक ३६५.
१७३२ चैत्र शुद्ध १५.
राजश्री केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोसी कुलकर्णी मौजे साकेगांव पो॥ सेवगांव. श्नो।। दौलतराव सिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ तुह्मी आपले जोसी कुलकर्णपणाचें वतन साहा गांवचें आपल्याले हिशाचे गाहण ठेऊन राजश्री त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून ऐवज घेतला त्याचें खत लेहून दिल्हे त्यांत करार लिहून दिल्हा की मुदतीस एवजाचा फडशा करून देऊं न करूं तर आमचें वतन तुह्मांस डुलेल बिलकुल वतनाची वहिवाट तुह्मी करावीं यांस तफावत अगर नवदीगर करूं तर आपले कुलस्वामीची शफत असें असतां मशारनिलेनीं वहिवाटीवर कारकून पाठविले त्यांस वहिवाट चाली न देता दिक्कत करिता ह्मणोन हुजूर विदित जालें त्याजवरून हे ताकीद सादर केली असे तरी तुह्मी गाहण लेहून खत लिहून दिल्हें त्यांत करार असतां दंडेली करणें कामाची नाही तर देखत पत्र तुमचे लेखाप्रमाणें वतनाची वहिवाट त्र्यंबकराव चिंतामण यांचे कारकुनाकडे सुरळीत चालों देणें याउपरी बोभाट आलियांस कार्यास येणार नाही. जाणिजे छ १४ रबिलावल बहुत काय लिहिणें.