Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीपांडुरंग.

लेखांक ३५९.

१७३१ फाल्गुन वद्य ८.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकरावजी स्वामीचे शेवेसी.
पो।। श्रीधर कृष्ण सां।। नमस्कार विनंती. येथील कुशल तां।। छ २२ सफरपावेतों श्रीकृपेकरून वर्तमान येथास्थित जाणोन स्वकीये कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आह्मी पुणियाहून क्षेत्र पंढरीस आल्याता।। पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तर सविस्तर लिहीत असिलें पाहिजे. यानतंर राजश्री विठोबा नाईक तांबवेकर याजकडे श्रीमंत नाना फडणीस याचे दरबारखर्चापों।। बाकी येणे ह्मणोन कोणी आकसांमुळें गैरवाका समजाविल्यावरून हुजरे वगैरे आपल्या विद्यमानें बसोन आह्माकडील कारकून कृष्णाजी रघुनाथ तेथे आहे त्यास व घरी बायकास वगैरे उपद्रव बहुत जाला. व आद्यापि हि होत आहे त्याकरितां आह्मी यावें. त्यास पेशजी तेथे नेहमी असतां सिंदे याजकडील घाटगे याजकडून वगैरे दररोज तांबेकर याचे देण्याचे धणी वगैरे फिर्याद जाऊन मनस्वी उपद्रव परिणामी तेथें कांही उत्पन्न व्हावे असी बाकी राहिली नाही दिनचर्यासुधां कठीण ऐसी खातरजमा होऊन बहुत श्रमाअंती परिहार व्हावा व श्रीमंत राजश्री रावसाहेब यांणी समक्ष समजोन घेऊन कृपा करून युक्तीच वाटें परिहार करीत आले तत्राप नेहमी उपद्रव कोठवर व चिरंजीवाचा वृतबंध हि करणें जरूर जाणोन क्षेत्री घरास आलो तों येथें हि घाटगे याजकडील आंमल आजपावेतों पुरविला होता. निवळपणें कामकाज सरकारांतून वगैरे समजोन व्हावे, असे स्वस्ततेचे दिवस आद्याप तेथे नाहींत. ना शरीरप्रकृत हि ठीक नाही जाणून राहिलों इतकियावर मार्गाची व तेथील सुपथेचे उत्तर आपले आलियावर येतो त्यास तांबवेकर याजकडे तगादा बसोन फल नाही व तगादा करावयाजोगा जाबसाल हि नाहीं येविसी पत्री तपसील कोठवरी लिहावा ? समजणारांनी आपल्यास समजाविलें त्यांतील कारण व आकस आह्मी प्रसंगी नाही जाणून उगवावा तें किमर्थ हें समक्षतेअंती कागदपत्रसुधां पक्की खातरजमा होईल येविसीं संवशय पडणार नाहीं. तूर्त अनुमानें ध्यानी आणावें. जैसा प्रतदिनचर्येसुधा विच्यार कठीण. परंतु कैलासवासी सदासिव नाईक तांबवेकर याचे वेळेस सरकारांत नजरा वगैरे पडोन खराबी होऊन दुकानें बंद जालें तथाप यातून काही काळ बरा होता ऐसें असोन नानाचे खाजगीचा ऐवज देणार घेणार समक्ष असतां यावयाजोगा असोन आज दाहा बारां वर्षे बाकी राहील न राहील हें ध्यानीं आणावें. पूर्वी च आपण या कामांत इतके नांव मात्र ऐकिले परंतु वलखपूर्वक समजले नव्हते. हाली लिहिल्यांत येऊन कळले त्यास आपले वडिलांचा व तांबवेकर याचा घरोबा व देवघेव व बाकीसाकी आद्याप काय हे आह्मी लिहावें तर आह्मांपेक्षा आपले ध्यानी सर्व आहे. परिणामी तांबवेकर याचे उणे व तुमचे. आपला आमचा त्याचा दुसरा विचार नाही जाणून लि॥ आहे तर आपण प्रसंगी असतां इतके दिवस लांबले हे च अधिक तर इत:पर तगादा उठऊन कारकून आमचा आहे तो च आपला ऐसें जाणून त्याजवर तांबवेकर याचे बायकामुलावर वडिलार्जित ममता तें ध्यानीं येऊन हरयेकविसी दिनचर्या चालावी येविसी वगैरे साहित्य जाहालियाचे उत्तर येऊन संतोष होय ऐसे करणे आपल्याकडे आहे इतकियावर हरतऱ्हेनें गैरवाका आणखी समजावितील त्यांतून समक्षतेअंती येक हि जाबसालास ठरणार नाहीत व त्याजकडे गुंते त्यामुळे आकस धरून समजावणेचे कारण काय ते समक्ष प्रत्ययासी येईल तर पुढे त्याचे ध्यानी न घेता मागे समजाऊन खराबी केली ते मात्र गैरवाका आकसामुळे असेल ठरले असतां भरून द्यावी येविसी खातरजमा तिराइतांची मागावी. यथाज्ञानें विस्तारपूर्वक लेखन केलें. इतिकियावर वडिलार्जित स्नेह व याचे देहप्रारब्धानरूप मर्जीस येईल तैसें व्हावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हे विनंती.