Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीनाथ स॥

लेखांक ३६१.

१७३२ चैत्र शुद्ध १५.
 

357

राजश्री बाळाजी सखदेव गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ दौलतराव शिंदे दंडवत. विनंति. उपरि त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपास हरी वल्लद पुंजाजी व नारायण वल्लद लोवजी ब्राह्मण जाई सेटे कसबें बिडकीणगांव यांनी आपले शेटेपणाचें निम्मे वतन प्रोक्त करून दिल्हे त्याचा हक भुसावर दरसद्दे बैलास रुपये दोन व किराणा दर शेकडा बैलास च्यार रुपये व मीठ व तांदूळ वगैरे व नकाशांत हक विकरी दर बैलास पैसा पक्का व बटीक व घोडी व गाड्यास दर रुपये ७ पका पैशाप्रे॥ व मागास येक सेला व चवाळें एक व कडबा वगैरे विकरीस गाड्यामागें पैसे पक्के दोन व जमीन मळे बिघे बारा त्यांत विहिरी सुमार चार सुद्धां व खंडेरायाचा माल जमीन बिघे पाउणशें व निम्में घर येणें प्रों।। दिल्हें. त्याचे वहिवाटीस कारकून त्र्यंबकराव चिंतामण यांनीं पाठविला असतांशेटेमार यांनी आपले खरीदखताप्रों।। निम्में वतनाचा दाखला न देता दंडेली करितात ह्मणोन विदित जाले त्याजवरून हे पत्र तुह्मांस लिहिले असे तरी हरी व नारायण शेटे व यांचे भाऊबंदास निक्षून ताकीद करून खरीदखताप्रों। निमे वतनाची वहिवाट हक्कदक्क व जमीनविहिरी व घरा सुद्धां त्र्यंबकराव चिंतामण यांचे कारकुनास सोंपून देऊन निम्मे वतनाची वहिवाट घेत जाणें. येविशीचा फिरोन बोभाट येऊं न देणें. र॥ छ १४ रावल सु॥ अशर मया तैन व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

340 1