Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३२५.

१७२१ कार्तिक शुद्ध २.

पे॥ छ ८ जमादिलाखर मया तैन व अलफ.

भूपलक्ष्माशोभित मित्रजनकार्य-करणे निरंतर-सुप्रसन्न-चित्त राजमान्य राजश्री रावजी स्वामीचे शेवेसी:-
मित्रवर्गांतरगत प्रियतम मित्र बलवंतराव सोनदेव देवस्थळी कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील क्षेम त॥ कार्तीक श्रु॥ २ द्वितीयेपावेतों मुक्काम जानवले येथे सुखरूप असो. विशेष. चिरंजीव राजश्री राघोपंत दादा तेथें गेलेपासून त्याची पत्रें दोन च्यार आलीं परंतु आपलें पत्र न आलें. तेणेकरून चित्त साक्षांकित आहे. तरी असेंन करावें. निरंतर येणाराबरोबर स्वकीय स्वामिगौरवादि आनंदलेखनेकरून आनंदवीत असावें. हें परंपरागत स्नेहास व आपले चातुर्यादि गुणास उचित असे यानंतर चिरंजीव तेथें आहेत त्याजवर कृपा तीर्थस्वरूप कैलासवासी तात्या आमचे पितृव्यावर कनिष्ट बंधूप्रमाणें करीत होते तद्नुरूप असावी. आपण जो करीतच असतील. जो गुण ज्याजमध्यें असतो तो गुण सहजामध्यें उपदेशावाचून घडतो. याविषयीं श्लोक. संत्यज्य दोषं गुण एव दृष्टीर्विधेयतामित्य फलं वचो मे॥ विहाय नीरं सकलोपि हंस: पय: प्रगृण्हात्युपदेशत: किं॥ सारांश, आपली कृपा चिरंजीवावर असावी आणि आपले व चिरंजीवाचे मनोदयासारखी उभयताची कार्ये श्रीमंत यजमान स्वामीपासून व्हावी हा हेतु आहे. सुज्ञाप्रती विशेष काय लिहावें ? माघमासीं भेटीस येतो. कळावें. बहुत काय लिहिणें? कृपा लोभाची वृद्धी निरंतर करावी. हे विनंती. नारळ शाहाळीं व पोफळें पाठविलीं आहेत घेऊन पावली. याचे उत्तर रवाना करावें. हे विनंती.