Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३२६.

१७२१ कार्तिक व॥.

अर्जदास्त श्रीमंत महाराज साहेबास विनंती.
सेक आमद हाडीर श्रीमंत नि॥ तोफखाना. साहेबी अर्ज लिहिली की पूर्वी नाडवाले जुमाशा फकीर महाराज नाना भाऊ साहेबाचे आमलापासून होते. फकीर बावानें कुवरनकीटी तिची कन्या हाजीफा तिजला बाई बाई ह्मणून छटु फरास यांनी बसावयाचा ठिकाणा केला. पुढें येक दिवसीं त्या बाईची आबरू घेतली. बदकर्म केले. याची चर्चा जाली तेव्हां दहावीस लोक मिळाले. फकीरबावास ह्मणू लागले कीं तुह्मी फकीर थोराचे पेदे असतांनीं हें तुमचेंजवळ कर्म वर्तलें हें काय ? तेव्हा फकीरबाबा बोलले कीं ऐसे कर्म तुह्मीं करू नये. तेव्हा छटुराम यानें उत्तर केलें कीं तुह्मांस या गोष्टीचे कांही बोलावयाचें काम नाहीं. तेव्हा गरीब फकीर उगें राहिले, तेव्हां या गडची व छटुरामची दोस्ती दाहावरशे चाललीं. श्रीमंत महाराज नारायणराव साहेबाचे गरदीचे वेळेस पळून गेले. छटूवरहि गरदी जाली. आतां श्रीमंतानीं तिची तिजला जागा काईम ठेविली आहे. पुढें तिनें फंद केला आहे कीं फकिराची जागा घ्यावी. नाडेवाले फकीरबावा यांची पूर्वीपासून कबरी व मसीदा जागा आहे त्यांत ईणें फकीराचे जागेवर धमार्थ बावणें ठेविली होती ती उलटून फकीराची जागा घ्यावयास उभी राहिली आहे. ह्मणते कीं माझे नवऱ्याची दोशस्तीन होती ती माझीच जागा यावर महाराजास अर्ज आहे कीं, इचे नवऱ्यानें दाहा मिळीनी केल्या त्या मिळून लटकें कुफराणें करून फकीरबावाची जागा घ्यावयास उभ्या राहिल्या तर देवें कीं काय? महाराजास इचे अर्ज आपण धनी आहांत यातले अर्थ ध्यानास आणवे मग ज्या मार्ग लावले त्या मार्ग चालू. या गोष्टीचा साक्ष पुरऊन देऊं. न देऊं तर सरकारचा गुनेगार.